मुंबईच्या प्रवेशद्वारावर डबलडेकर इंटरचेंज उभारणार, वाहतूक कोंडी फोडणार

मुंबई : जवाहरलाल नेहरू बंदरावरुन (जेएनपीए) येणारी आणि जाणारी मालवाहक वाहने, तीन महामार्गांकडे जाणारी वाहतूक, मुंबई, ठाणे, कल्याणला जोडणारे रस्ते, यामुळे कळंबोली हे मुंबईचे प्रवेशद्वार कायम वाहतूक कोंडीत असते. ही कोंडी ७५५ कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या 'डबलडेकर इंटरचेंजद्वारे' फोडली जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अर्थात एनएचएआयने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे.



कळंबोली जंक्शनला शीव-पनवेल रस्ता येऊन मिळतो. हा रस्ता पुढे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जातो. दुसरा रस्ता शीळफाटा, कल्याण दिशेने येऊन जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने पुण्याकडे जातो. पनवेलमार्गे गोव्याच्या दिशेने जाणारा राष्ट्रीय महामार्ग याच जंक्शनवरून पुढे जातो. जवाहरलाल नेहरू बंदरासाठीची वाहतूकही याच जंक्शनवरून शीळ-कल्याण किंवा पनवेल-शीव रस्त्याने ये-जा करत असते. यामुळे कळंबोलीत अनेकदा वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी 'डबलडेकर इंटरचेंज' उभारण्याची योजना आहे.



'डबलडेकर इंटरचेंज'मध्ये जमिनीवरील वाहतूक पहिल्या आणि तिसऱ्या मजल्यावरील उड्डाणपुलाद्वारे होणार आहे. शीळफाटा-कल्याणकडून येऊन नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी भूमिगत रस्ता असेल. याच भूमिगत रस्त्याच्या बाहेर पडून जुना मुंबई-पुणे महामार्गही गाठता येईल. मुंबईहून गोव्याकडे जाणारी वाहतूक पहिल्या मजल्यावरून असेल. याच पहिल्या मजल्यावर एक फाटा फुटेल व तो रस्ता पुढे ‘जेएनपीए’च्या दिशेने खाली उतरेल. ज्यांना मुंबई-पुणे जुना महामार्ग किंवा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जायचे आहे, त्यांनाही पहिल्या मजल्याचाच वापर करावा लागेल. शीळफाटा-कल्याण ते गोवा महामार्ग (पनवेल), शीळफाटा-कल्याण ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, शीळफाटा-कल्याण ते गोवा महामार्ग व शीळफाटा-कल्याण ते जेएनपीए जाणाऱ्यांसाठी दुसऱ्या मजल्यावरून रस्ता असेल. या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली असून प्राथमिक कामे सुरू झाली आहेत.



कळंबोली जंक्शनचा 'डबलडेकर इंटरचेंज'द्वारे विकास साधताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने येऊन ‘जेएनपीए’कडे किंवा गोवा महामार्गाकडे जाण्यासाठी जंक्शनच्या वायव्य दिशेकडील ८८८७.४० चौरस मीटर जमिनीचे भूसंपादन आवश्यक आहे. ही जमीन सिडकोच्या ताब्यात आहे. यामुळे सिडकोच्या मदतीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

  1. कळंबोली जंक्शनचा 'डबलडेकर इंटरचेंज'

  2. एकूण लांबी : १५.५३२ किमी

  3. दैनंदिन वाहनांची अपेक्षित ये-जा : ५.८२ लाख (२०४६मध्ये)

  4. भूमिगत रस्त्याची लांबी : ८७१ मीटर

  5. प्रत्यक्ष बांधकाम खर्च (करांसह) : ६९७.२२ कोटी रु. (विविध वाहिन्या हलविण्यासाठी १३१.३० कोटी रुपये)

  6. देखभाल, आपत्कालीनसह एकूण खर्च : ७५५.७१ कोटी रु.

Comments
Add Comment

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा

शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना सवलतीच्या दरात वीज

मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज सवलतीची केली घोषणा मुंबई : राज्य

कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांचे आयोजन

सोलापूर: येत्या काही दिवसांत पंढरपूर येथे कार्तिकी वारीचा सोहळा रंगणार आहे. यासाठी विविध राज्यातून वारकऱ्यांचा

मनसे दीपोत्सवात ड्रोन उडवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंबई : शिवाजी पार्क पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपोत्सव कार्यक्रमात ड्रोन उडवणाऱ्या अनेक

खोल समुद्रातील मासेमारीसाठी १४ सहकारी संस्थांना अद्ययावत समुद्री नौका

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते सोमवारी वितरण मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २००

मुंबई मेट्रो ३ मध्ये 'उतरण्यासाठी' जिना नाही; प्रवाशांना त्रास

मुंबई : मुंबईच्या नवीन मेट्रो लाईन ३ (Aqua Line) च्या मेट्रो स्टेशनवर खाली उतरण्यासाठी सरकते जिने (Escalators) नाहीत. ऑक्टोबर