AC e-Bus : टीएमटीच्या ताफ्यात दाखल होणार १०० एसी ई बसेस!

नवी दिल्ली : 'पीएम ई बस सेवा' (PMP e-Bus) योजने अंतर्गत केंद्र शासनाने ठाणे महापालिकेच्या (Thane Municipality) परिवहन सेवेसाठी १०० पर्यावरणपुरक वातानुकूलीत ई बसेस मंजूर केल्या आहेत. येत्या एप्रिल महिन्यात या बसेस टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. वाढीव बसेस आणि उर्वरित केंद्र शासनाच्या अनुदानासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.



नगरविकास आणि गृहनिर्माण विषयक स्थायी समितीची बैठक श्री मागुंता श्रीनिवासुलु रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली संसदेत झाली. या समितीचा सदस्य म्हणून खासदार नरेश म्हस्के या बैठकीला उपस्थित होते. परिवहन सेवेच्या विस्तारासाठी तसेच आगारांच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि अद्ययावतीकरण या विषयांवर ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी महत्वपूर्ण मुद्दे बैठकीत मांडले.

प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणाऱ्या १०० वातानुकूलीत आरामदायी ई बसेस ठाणेकरांच्या सेवेसाठी दिल्याबद्दल बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे प्रथम आभार मानले. तसेच ठाणे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे परिवहन सेवेला जादा बसेस द्याव्यात, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

कोविड-१९ साथीच्या रोगाचा सामना करत संघर्ष करत असलेल्या ठाणे महापालिकेवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनुदानात ५ रु. वाढ म्हणजेच २४ प्रति किलोमीटर ऐवजी रु.२९ प्रति किलोमीटर इतके अनुदान देण्याची तसेच योजनेसाठी किमान अंतराची आवश्यकता २०० किलोमीटरवरून १६० किलोमीटरपर्यंत कमी करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. या बदलामुळे ही योजना नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि फायदेशीर होईल ठरेल असे बैठकीत त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ठाणे परिवहन सेवेला जसे केंद्र शासन सहकार्य करत आहे तसेच देशातील अन्य राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवांना सहकार्य करावे, अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. म्हस्के यांच्या सूचनेचे बैठकीला उपस्थित अन्य खासदारांनी स्वागत केले.

Comments
Add Comment

Glaciers in the Himalayas : हिमालयात लपलेत २४३१ ‘धोक्याची सरोवरे’; फुटली तर माजू शकतो महापूर

नवी दिल्ली : हिमालयातील हिमनद्या वेगाने मागे सरकत असताना त्यातून निर्माण होणाऱ्या हिमनदीय सरोवरांच्या वाढत्या

Nepal Flood Update : ६० वा वाढदिवस साजरा करायला गेले अन्... नेपाळमधील महापुरात अमेरिकेतील भारतीय दांपत्य बेपत्ता, मुली एका कॉलच्या प्रतीक्षेत

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात निसर्गाने घडवलेल्या भीषण तांडवामुळे हजारो भाविक आणि पर्यटक संकटात सापडले

Viral 'brother-sister' : ३५ हजार फूट उंचीवरही राखीचं नातं; एअर इंडियाचे भाऊ-बहिण बनले सहकारी, कहाणी होतेय व्हायरल

नवी दिल्ली: रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधून एअर इंडियाने मणिपूरमधील एका होतकरू भाऊ-बहिणीची

Punjab : महागाई भत्त्यासाठी पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सचिवालयाचे कामकाज ठप्प

चंदीगड : अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्याच्या (DA) मागणीसाठी पंजाबमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी

Karnataka teachers suspended : RSS च्या पथसंचालनात सहभाग घेणं पडलं महाग! कर्नाटकातील २ सरकारी शिक्षकांवर निलंबनाची मोठी कारवाई

कर्नाटक : कर्नाटकच्या यादगीर जिल्ह्यात शिक्षण विभागाने दोन सरकारी शिक्षकांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली

Raksha Bandhan : राष्ट्रपतींसह अन्य नेत्यांनी देशवासीयांना रक्षाबंधन सणाच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह