Sunday, February 9, 2025
Homeताज्या घडामोडीPower Cut : पुणेकरांची बत्ती गुल! 'या' भागात उद्या वीजपुरवठा राहणार बंद

Power Cut : पुणेकरांची बत्ती गुल! ‘या’ भागात उद्या वीजपुरवठा राहणार बंद

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो व महापारेषणच्या अतिउच्चदाब वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांसाठी महापारेषणच्या तीन अतिउच्चदाब उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार (Power Cut) आहे. परिणामी महावितरणच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे उद्या ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रामुख्याने शिवाजीनगरसह डेक्कनमधील परिसरात वीजपुरवठा बंद राहणार आहे. (Power supply off)

Maharashtrian Comedian : माजी मुख्यमंत्री शिंदेंच्या नातवावर जोक करणाऱ्या विनोदवीराला मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. या मार्गावरील महापारेषणच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येत आहे. मात्र त्यासाठी २२०/१३२ केव्ही गणेशखिंड व चिंचवड अतिउच्चदाब उपकेंद्र आणि कोथरूडमधील जीकेआरएस उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.

त्यामुळे गणेशखिंड, मॉडेल कॉलनी, दीप बंगला परिसर, वडारवाडी, गोखलेनगर, जनता वसाहत, एमआयजी कॉलनी, वैदूवाडी, जनवाडी, वेताळबाबा चौक, मंगलवाडी, सेनापती बापट मार्ग, रमणबाग चौक, न्यू मराठी स्कूल, नारायणपेठ, शिवाजीनगर गावठाण, जंगली महाराज रोड, रोकडोबा मंदिर परिसर, लक्ष्मी रोड, कुमठेकर चौक, पोलीस लाईन वसाहत, घोले रोड, मॉडर्न कॉलेज, विजय टॉकीज, रेवेन्यू कॉलनी, सिमला ऑफीस, आकाशवाणी, जिल्हा न्यायालय, कामगार पुतळा, मेट्रो स्टेशन, संचेती हॉस्पिटल, ठुबे पार्क, औंध गाव, सिद्धार्थ नगर, परिहार चौक, ब्रेमेन चौक, संघवी रोड, ओम सुपर मार्केट, थोरात चौक, वाकडेवाडी, साखर संकुल रोड, चाफेकरनगर, आकाशवाणी कॉलनी, राहुल थिएटर, खैरेवाडी, दळवी हॉस्पिटल, अशोकनगर, रेंज हिल्स रोड, काकडे मॉल, एबीआयएल, मोदीबाग, चव्हाणनगर तसेच आपटे रोड, रुपाली गल्ली, शिरोळे रोड, घोले रोड, पुलाची वाडी, संभाजी गार्डन, एफसी रोड, वैशाली हॉटेल, सुतारदरा, शिवतिर्थनगर, साम्राज्यनगर, शिक्षकनगर, जयभवानीनगर, किष्किंधानगर आदी परिसरातील वीजपुरवठा उद्या सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मेट्रो, महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. वीज बंदच्या कालावधीबाबत संबंधित वीजग्राहकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -