आष्टी : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी लावून धरले आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी सुरेश धस यांनी अनेक मोर्चे काढले होते. या प्रकरणात सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरेश धस यांना आवर घालण्याची मागणी करण्यात येत होती. आमदार सुरेश धस हे आधुनिक भगीरथ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
बीडच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे आणि मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले. सुरेश धस मागे लागले की डोके खाऊन टाकतात असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर कारवाई होणारच, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवान : सुरेश धस
मला कुणाकडून अपेक्षा नाही, देवेंद्र बाहुबली मदत करू शकतात, असा विश्वास व्यक्त करत संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कणखर भूमिका घेतली. बीड जिल्ह्याची बदनामी होतेय, असे काही लोक म्हणतात. पण काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्याने जिल्ह्याची प्रतिमा मलीन झाली होती. संतोष देशमुख खून प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कणखर भूमिका घेतली. कुणालाच सोडणार नाही असे सांगितले.
Udayanraje Bhosale : राहुल सोलापूरकर सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत
अजूनही राख, वाळू आणि भूमाफियांना मोका लावला पाहिजे, असे आमदार धस म्हणाले. २०१९ मध्ये पूर्ण बहुमत येऊनही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. जनादेश आपल्या बाजूने होता, पण तो पहाटेचा चोरून नेला. फडणवीस यांना राजकीय आणि कौटुंबिक जीवनातून उद्ध्वस करण्याची कटकारस्थाने रचली गेली. पण त्यांनी संघर्ष केला आणि त्यावर मात केली. देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवाल आहेत, असेही आमदार सुरेश धस म्हणाले.