खा. उदयनराजे भोसले यांनी केला संताप व्यक्त
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलेल्या राहुल सोलापूरक सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) म्हणाले. देशातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. राहुल सोलापूरकर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकरच्या विधानावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला विचार दिले. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी कुटुंब म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.
Bandra Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात आता सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा
राहुल सोलापूर कोण आहे? अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. या लोकांना गाडले पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.
उदयनराजे भोसले म्हणाले की, खासदार, आमदार, मंत्री, उद्योजक कोणी असला आणि असे विधान केले तर कोणालाही सोडायला नको. त्यांना ठेचून गाडले पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे, असे ते म्हणाले. यांना वेळीच आळा घातला नाही तर आपला इतिहास वेगळा वळण घेईल, असे ते म्हणाले. औरंगजेब हरामखोरहोता. तू (राहुल) कमी हरामखोर आहेस का ? तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटते, असा घणाघात त्यांनी केला.