मुंबई : सध्या सोशल मीडियावर अनेक कंटेन्ट क्रिएटर त्यांच्या वेगवेगळ्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. काही कंटेन्टसाठी, काही गाण्यांसाठी तर काही विनोदवीर म्हणून प्रसिद्ध आहेत. अशाच एका मराठमोळ्या विनोदवीरावर सोलापूरमध्ये चालू असलेल्या स्टँडअप कॉमेडी शो दरम्यान मारहाण झाल्याची घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवावर मारलेला जोक प्रणित मोरे या विनोदवीराला चांगलाच महागात पडला. याप्रकरणी प्रणितने शासनाकडे मदत मागितली आहे.
मराठमोळा विनोदवीर महाराष्ट्रीयन भाऊ अशी ओळख असलेल्या प्रणित मोरेचा २ फेब्रुवारी रोजी सोलापुरातल्या 24K क्राफ्ट ब्रूझ या हॉटेलमध्ये कॉमेडी शो होता. हा शो सायंकाळी ५:४५ वाजता संपला. शो संपल्यानंतर प्रणित चाहत्यांमध्ये फोटो काढण्यास गेला असता समोरून आलेल्या ११-१२ जणांच्या जमावाने त्याच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला केला. यानंतर त्यातील गुंडांनी प्रणितला धमकावले “अगली बार वीर पहारिया बाबा पे जोक मारके दिखा” असं म्हणाला.
“महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियावर खोचक विनोद केल्याने ही मारहाण झाली. या हल्ल्याचा खरा सूत्रधार तनवीर शेख आहे. हल्ला झाल्यानंतर माझ्या सहकार्यांनी 24K क्राफ्ट ब्रूझ हॉटेलच्या मॅनेजरकडे cctv फुटेज मागितले असता त्यांनी नकार दर्शवला शिवाय हल्ला झाला त्याक्षणी हॉटेलवर काहीच सुरक्षा नव्हती. एका महाराष्ट्रातील कलाकाराची महाराष्ट्रातच गळचेपी होत असून मला न्याय पाहिजे” असं प्रणितने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे.
वीर हा स्मृती शिंदे व संजय पहारिया यांचा मुलगा आहे. वीरचे आजोबा सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. वीर पहारियाने ‘स्काय फोर्स’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…