Bandra Bhabha Hospital : वांद्रे भाभा रुग्णालयात आता सुपरस्पेशालिटी आरोग्य सुविधा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे (पश्चिम) येथील खुरशेदजी बेहरामजी भाभा सर्वसाधारण रुग्णालयाच्या (Bandra Bhabha Hospital) नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. त्यामुळे आता सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त आरोग्यसेवा के.बी. भाभा रुग्णालयातच उपलब्ध होणार आहे.


या लोकार्पण सोहळ्याला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, उपायुक्त (परिमंडळ ३) विश्वास मोटे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) चंद्रकांत पवार, एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध होतील. यापूर्वी, विविध उपचारांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जात असे. मात्र, आता सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त आरोग्यसेवा के.बी. भाभा रुग्णालयातच उपलब्ध होणार असल्याने ही आवश्यकता राहणार नाही, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी केले.



पालकमंत्री आशिष शेलार पुढे म्हणाले, "वांद्रे परिसरात पंचतारांकित रुग्णालये असली तरी सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. महानगरपालिका याच उद्देशाने हे कार्य करत आहे. भाभा रुग्णालयात उपचार घेणाऱया नागरिकांसाठी न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डिओलॉजी, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर आणि अत्याधुनिक उपचार विभाग अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. तसेच सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. तसेच, रुग्णालयातील स्वच्छता राखणे ही प्रशासनाइतकीच नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे, असेही शेलार यांनी नमूद केले.


 



 

आठ लाख लोकसंख्येला होणार लाभः


के. बी. भाभा रुग्णालयाच्या भौगोलिक स्थानामुळे वांद्रे (पूर्व आणि पश्चिम), खार (पूर्व आणि पश्चिम), सांताक्रूझ (पूर्व), कुर्ला (पश्चिम) या भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. अंदाजे ८ लाख लोकसंख्येला या रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते. दररोज २,००० ते २,२०० रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. पश्चिम उपनगरातील नागरिकांना जलद आणि उत्तम सेवा देण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.



रुग्णालयाचा विस्तार – दोन टप्प्यात कामः


रुग्णालयाच्या विस्ताराचा पहिला टप्पा १२ मजली विस्तारित इमारतीसह पूर्ण झाला आहे. ही इमारत नागरी आरोग्य सेवांसाठी समर्पित करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात मूळ इमारतीची डागडुजी आणि देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. दोन्ही इमारतींमध्ये मिळून ४९७ रुग्णशय्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अतिदक्षता (आयसीयू) आणि विविध विभागांचे विशेष कक्ष यांचा समावेश आहे. तसेच, अत्याधुनिक मॉड्युलर तंत्रज्ञानावर आधारित १४ शस्त्रक्रिया विभाग आगामी काळात संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील