नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांनी चॅट-जीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय-ऍपचा वापर टाळावा. यामुळे सरकारच्या गोपनीय माहितीला धोका निर्माण होऊ शकतो असे निर्देश केंद्रीय अर्थमंत्रालयाने जारी केले आहेत. यासंदर्भात अर्थमंत्रालयाने २९ जानेवारी २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन संगणक आणि मोबाईलमध्ये चॅट-जीपीटी व डीपसीक अशा प्रकराच्या एआय-ऍपचा वापर करु नये. अशा प्रकारचे ऍपच्या वापरामुळे सरकारची महत्त्वपूर्ण आणि गोपनीय माहिती उघड होण्याचा धोका आहे. त्यामुळे चॅटजीपीटी आणि डीपसीक सारख्या एआय टूल्सचा वापर टाळावा.
अशा प्रकराच्या चॅटबॉट्समुळे सरकारी कागदपत्रे आणि डेटाच्या गोपनीयतेला धोका निर्माण होतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ही अधिसूचना २९ जानेवारी जारी केली आहे. मात्र तब्बल एक आवठड्यानंतर ही सूचना चर्चेत आली आहे. कारण ओपन-एआयचे सीईओ सॅम ऑल्टमन भारताच्या दौऱ्यावर येत असून ते केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
चीनचे अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या डीपसीकवर प्रतिक्रिया देताना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या स्वतःच्या पायाभूत मॉडेलसह जागतिक एआय स्पर्धेत उतरणार असल्याचे सूतोवाच केले होते. भारतात बनवलेले फाउंडेशनल मॉडेल्स जगातील सर्वोत्तम मॉडेल्सशी स्पर्धा करू शकतील.अल्गोरिथमिक कार्यक्षमतेसह आपण हे मॉडेल्स खूपच कमी वेळेत तयार करू शकतो. आपल्याकडे काही महिन्यांतच जागतिक दर्जाचे फाउंडेशनल एआय मॉडेल असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…