कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस

  80

मुंबई: १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य राशीमध्ये परिवर्तन करत आहे. सूर्य संपूर्ण एका वर्षानंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत गोचर करत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते सूर्याचे हा राशी परिवर्तन तीन राशींच्या व्यक्तींसाठी अधिक लाभदायक असू शकते.

जाणून घ्या तुमची रास यात आहे का?


मेष - धन वृद्धीचे योग बनत आहेत. तुमच्या इनकममध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील. गुंतवणुकीच्या योजनांमधून खूप लाभ मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. विचार केलेल्या योजना सफल होतील. नवी कामे सुरू करण्यास उत्तम वेळ आहे.

वृषभ - नोकरीपेशा लोकांचे प्रमोशन होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित समस्यांतून सुटका होईल. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आई-वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल.



वृश्चिक - नवे घर अथवा नवे वाहन यासारख्या भौतिक सुखाची प्राप्ती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. डोक्यावर कर्जाचा भार कमी होईल. खर्चांमध्ये कमतरता आल्याने बँक बॅलन्स वाढेल.
Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली