पंतप्रधान मोदी महाकुंभमेळ्यात जाणार ?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात जाणार आहेत. ते उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात जाऊन साधुसंतांचे आशीर्वाद घेणार आणि पवित्र नदीत स्नान करणार आहेत. पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी ११ ते ११.३० दरम्यान पवित्र नदीत स्नान करणार असल्याचे वृत्त आहे.



दिल्ली विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी एका टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान बुधवार ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदी दिल्ली बाहेर महाकुंभमेळ्यात जाणार आहेत. दिल्ली विधानसभेसाठी मतमोजणी आणि निकाल शनिवार ८ फेब्रुवारी रोजी आहे. याआधी पंतप्रधान महाकुंभमेळ्याला जाणे रद्द करणार असल्याचे वृत्त होते. महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ही शक्यता व्यक्त होत होती. पण व्यवस्थापनाने परिस्थिती नियंत्रणात आली. यानंतर ठरल्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांचा महाकुंभमेळ्याचा दौरा जाहीर झाला आहे.



महाकुंभमेळ्यात आतापर्यंत १३ जानेवारी रोजी पौषातील पौर्णिमेनिमित्त तसेच १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांतीनिमित्त, २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येनिमित्त, ३ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त पवित्र स्नान झाले आहे. आता १२ फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमा आणि २६ जानेवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त पवित्र स्नान होणार आहे. पवित्र स्नानाच्या दिवशी होणाऱ्या अफाट गर्दीमुळे सुरक्षिततेसाठी पंतप्रधान मोदी महत्त्वाच्या दिवसाऐवजी बुधवारी ५ फेब्रुवारी रोजी महाकुंभमेळ्यात सहभागी होणार आहेत. आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करुन साधूसंतांचे आशीर्वाद घेतले आहे. देवदर्शन केले आहे. देशातील अनेक नेत्यांनीही महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भूतानचे राजे अशा अनेक दिग्गजांचा समावेश आहे.
Comments
Add Comment

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी

तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र… ८५ लाखांची बक्षिसं! मुंबई  : भारतातील

संरक्षण दलाच्या तिन्ही दलांसाठी ७९ हजार कोटी

नवी दिल्ली  : भारताच्या तिन्ही सैन्य दलांना अधिक शक्तिशाली आणि आधुनिक बनवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने एक मोठा

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

तब्बल ५ हजार ५०० किलो वजनाची सोन्याची बुद्ध मूर्ती!

बुद्धांचे अनुयायी जगभरात अब्जावधींच्या संख्येने आहेत, जे अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. भगवान बुद्धांना भगवान