Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

दादरमध्ये बुधवार - गुरुवारी मुंबई शहर ग्रंथोत्सव

दादरमध्ये बुधवार - गुरुवारी मुंबई शहर ग्रंथोत्सव
मुंबई : दादरमध्ये बुधवार ५ फेब्रुवारी आणि गुरुवार ६ फेब्रुवारी असे दोन दिवस मुंबई शहर ग्रंथोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव दादरच्या पूर्व भागात मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे साजरा होणार आहे. ग्रंथोत्सवात विविध साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी सकाळी ९.३० वाजता ग्रंथोत्सवाची सुरुवात भव्य ग्रंथदिंडीने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ ते १ या वेळेत मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर “लेखक तुमच्या भेटीला” आणि “एका संगीतकाराची मुशाफिरी” या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर गुरुवारी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्याने आणि परिसंवाद होणार आहेत. तसेच “शब्दव्रती” या कार्यक्रमात निवडक मराठी कवयित्रींच्या कविता सादर केल्या जातील. याशिवाय, ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधिक गौरव करून ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.
मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आणि परिसंवाद होणार आहेत. दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा मुंबईकर नागरिक, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, मुंबई शहर शशिकांत काकड यांनी केले आहे.
Comments
Add Comment