मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. (Mumbai Crime)
भारताला मोठा झटका, फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शनिवारी तिच्या १९ वर्षीय मुलासोबत हरिद्वारवरून फिरण्यासाठी मुंबईला आली होती. या महिलेला एका नातेवाईकाकडे जायचे होते, मात्र उशीर झाल्यामुळे वांद्रे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म सहा आणि सातच्या मध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. मात्र रात्री एक वाजेच्या सुमारास २७ वर्षीय व्यक्तीने महिलेला तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेले. त्यानंतर चौकशी करत जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले अन् अत्याचार केल्याचे महिलेने जबाबात म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे पोर्टरचा माग काढण्यात यश मिळविले आणि न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. (Mumbai Crime)