मुंबई : शहरात स्वत:च हक्काचं घरं असण्याचं अनेकांच स्वप्न असतं. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता सर्वसाामान्य नागरिक म्हाडाच्या घरांवर अवलंबून असतात. अलीकडेच मुंबई कोकण मंडळाने २ हजार २६४ घरांसाठी लॉटरी (Mhada Lottery) जाहीर केली होती. तर उद्या याबाबत सोडत काढली जाणार आहे.
ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हाडा कोकण मंडळ घरांचा सोडत कार्यक्रम पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते लॉटरीची सोडत काढली जाणार आहे.
दरम्यान, सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदार म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर https://housing.mhada.gov.in/ जाऊन त्यांचे नाव पाहू शकणार आहेत. वेबसाइटवर जाऊन त्यांना अॅप्लीकेशन नंबर टाकावा लागणार आहे. त्यानंतर अर्जदाराला त्याचे नाव लकी ड्रॉसाठी लागलं की नाही हे समजणार आहे. (Mhada Lottery)
ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, ओरस, वेंगुर्ला आणि मालवण सारख्या भागात म्हाडा कोकण मंडळ घरांची सोडत असणार आहे.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…