मुंबई : इंडिगो एअरलाईन्सच्या दोन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. कर्मचाऱ्यांच्या भाजपातील प्रवेशामुळे इंडिगो एअरलाईन्समधील उद्धव ठाकरे गटाच्या कर्मचारी संघटनेला धक्का बसला आहे.
मुंबई महापालिकेचा ७४,४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर
मुंबई महापालिकेचा सन २०२५-२६ अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून तब्बल ७४ ४२७. ४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. ६०.६५ कोटी रुपये शिलकीच्या ...
भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचे भाजपात स्वागत केले. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन समाजातील सर्व थरातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करत आहे. भाजपाच्या नेत्यांचे हे काम बघितल्यानंतरच इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे, असे रविंद्र चव्हाण म्हणाले. ते मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांच्या पक्ष प्रवेशावेळी बोलत होते.
CM Devendra Fadnvis : आईने मंगळसूत्र विकले, फडणवीस हळहळले, मुख्यमंत्र्यांनी मुलाचे पालकत्व स्वीकारले
गडचिरोली : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले. या पालकत्वावरून गटागटात नाराजी होतीच मात्र ...
भाजपात प्रवेश करणाऱ्यांमध्ये युनिट अध्यक्ष करण कांबळे, युनिट सरचिटणीस दिनेश शेवाळे, युनिट उपाध्यक्ष सिराज हाश्मी, युनिट कोषाध्यक्ष चंदन कांडू, संयुक्त खजिनदार मोहम्मद शाहिद हुसेन, युनिट सेक्रेटरी रणजीत नरे, युनिट सेक्रेटरी राकेश कदम, युनिट सेक्रेटरी लक्ष्मण सुरवसे, युनिट सेक्रेटरी विजय यादव, युनिट समिती सदस्य अंकुश निकम, सुनील लोखंडे,अंकुश इंगळे, संदीप कांबळे, शैलेश पवार, सचिन काटकर, सचिन आग, सचिन कांबळे, श्रीनाथ पाडेकर, महबूब पाशा, हर्षद अहिरे, रोहित चतुर्वेदी, ओंकार नाईक, विक्रांत डोईफोडे, विनीत पाटील, संदीप सानप, पूजाताई तांडेल, सपनाताई गोडक्या आदी सदस्य आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
Rahul Solapurkar : 'शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले'; मराठी अभिनेत्याचा खळबळजनक दावा!
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग हा इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा क्षण मानला जातो. मात्र, या ऐतिहासिक घटनेबाबत मराठी ...
इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला त्यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी उपस्थित होते.
दादरमध्ये बुधवार - गुरुवारी मुंबई शहर ग्रंथोत्सव
मुंबई : दादरमध्ये बुधवार ५ फेब्रुवारी आणि गुरुवार ६ फेब्रुवारी असे दोन दिवस मुंबई शहर ग्रंथोत्सव साजरा होणार आहे. हा उत्सव दादरच्या पूर्व भागात मुंबई ...