गडचिरोली : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले. या पालकत्वावरून गटागटात नाराजी होतीच मात्र शेवटी फडणवीसांनी गडचिरोलीच्या पालकत्वाचं धनुष्य उचललं. याच गडचिरोलीतून मन पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे नाही म्हणून मातेने गळ्यातलं मंगळसूत्र विकलं. वडिलांनी मुख्यमंत्र्यांना मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी मदतीचं पत्र लिहलं.
Ritesh Genelia Marriage Anniversary : रितेश जेनेलियाच्या लग्नाची भन्नाट गोष्ट ऐकली का?
गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील हितापाडी येथील १७ वर्षीय सुनील रमेश पुंगाटी या मुलाला ताप आल्याने त्याची प्रकृती खालावली. वडील रमेश पुंगाटी हे उपचारासाठी सुनीलला नागपुरात घेऊन आले. एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी एक लाख रुपये खर्च असल्याने मुलाच्या आईने आपले मंगळसूत्र विकून रुग्णालयात पैसे भरले. मुलगा व्हेंटिलेटरवर असून प्रकृती गंभीर असल्याने आईवडील चिंतेत होते.
पैसे नसल्याने प्रसंगी ते उपाशी राहत होते. मुलाच्या वडिलांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले. या घटनेतून मुख्यमंत्री फडणवीस यांची संवेदनशीलता दिसून आली आहे.