परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कर्नाटक राज्य परिवहन सेवेला भेट

मुंबई : कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची 'प्रतिष्ठित सेवा' अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्र देखील करणे शक्य आहे! असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी काढले ते कर्नाटक दौऱ्यावर असताना बंगळुरू येथील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाच्या भेटी दरम्यान बोलत होते.


महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक हे १ व २ फेब्रुवारी रोजी दोन दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर होते. आज बंगळुरू येथे त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी त्यांच्यासोबत कर्नाटक राज्याचे परिवहन मंत्री डॉ . रामलिंगा रेड्डी यांच्या सह राज्याचे परिवहन सचिव डॉ.एन.व्ही. प्रसाद व कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.रिझवान नवाब तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, श्री.नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व श्री . नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र ) हे अधिकारी उपस्थित होते.



या वेळी मंत्री सरनाईक यांनी कर्नाटक राज्य परिवहन सेवेद्वारे चालवल्या जाणाऱ्या अंबारी, ऐरावत, राजहंस यासारख्या प्रीमियम सेवेच्या बसेस बरोबर इतर बसेस ची पहाणी केली, तसेच या बसेस कशा पद्धतीने चालवल्या जातात याची माहिती घेतली. " आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या बस सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे. खाजगी बसेसच्या तुलनेमध्ये सुरक्षित आणि वेळेवर सेवा देण्यासाठी या बस सेवा अतिशय प्रसिद्ध आहे." अशा प्रकारे बस सेवेचे कौतुक केले .


या वेळी कर्नाटक परिवहन सेवेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या राज्यात सध्या चालवल्या जात असलेल्या सर्व प्रकारच्या बसेस मंत्री सरनाईक यांना दाखविल्या. त्यामध्ये ९ मीटर पासून १५ मीटर पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. अगदी डोंगरी भागापासून हम रस्त्यावर धावतील अशा वेगवेगळ्या इंजिन आणि आसन क्षमतेच्या, विविध सोयी -सुविधा असलेल्या बसेस कशाप्रकारे गरजेनुसार प्रवाशांसाठी उपलब्ध केले जातात, याची माहिती यावेळी त्यांना देण्यात आली. तसेच लांब पल्ल्याची सेवा देणाऱ्या बसेस मध्ये "वायफाय " पासून " युरिनल " पर्यंत सोयीसुविधा प्रवाशांसाठी कशा प्राप्त करून दिले जातात. तसेच ई-तिकीट आणि ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सेवा देखील प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे, हे देखील यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांना सांगितले.


दरम्यान परिवहन सेवेच्या सादरीकरणात माहिती देताना,संपूर्ण राज्याचे व्यवस्थापन वेगवेगळ्या चार प्रादेशिक विभागांमध्ये विभागण्यात आले असून त्यासाठी प्रत्येक विभागाला आय.ए.एस.(I.A.S.) दर्जाचे एक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. तसेच राज्यस्तरावर या सर्वांचे संचालन करण्यासाठी वरिष्ठ आय.ए.एस. दर्जाचे अधिकारी नेमण्यात आले आहेत .त्यामुळे एकूण राज्याच्या परिवहन सेवेमध्ये सुसूत्रता आणणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा प्राप्त करून देणे यासाठी प्रशासकीय रचनेमध्ये केलेले सकारात्मक बदल महत्वाची भूमिका बजावतात यांची माहिती देखील मंत्री महोदयांच्या देण्यात आली.

Comments
Add Comment

म्हाडा सेस इमारती आणि भाडेकरुंसह दुकानांनी अडवला हँकॉक पुलाचा मार्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या हँकॉक पुलाची

हरकती व सूचनांच्या पडताळणीसाठी स्थळ पाहणी करुन योग्य निर्णय घ्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ च्या अनुषंगाने, संबंधित सर्व

महात्मा फुलेंशी संबंधित फाईल मंत्रालयातून गायब; महसूल मंत्र्यांनी घेतली गंभीर दखल

मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब

Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून

Maharashtra Lok Bhavan : महाराष्ट्राचे ‘राजभवन’ झाले ‘लोकभवन’; अधिसूचना जारी!

मुंबई : केंद्र सरकारने पंतप्रधान कार्यालयाचे नाव ‘लोक कल्याण मार्ग’ आणि ‘पीएम हाऊस’ ऐवजी ‘लोकभवन’ असे

Pratap Sarnaik : बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ' रॅपीडो, उबेर ' सारख्या ॲप आधारित कंपन्या वर गुन्हे दाखल करा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या '