Sunday, April 20, 2025
Homeताज्या घडामोडीRatha Saptami 2025 Date : कधी आहे रथसप्तमी ? रथसप्तमीच्या दिवशीचे मुहूर्त...

Ratha Saptami 2025 Date : कधी आहे रथसप्तमी ? रथसप्तमीच्या दिवशीचे मुहूर्त ?

मुंबई : रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी या नावांनीही ओळखले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो. अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य याचा हा जन्मदिवस आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करावे. लाल फुले, चंदन, कापूर अर्पण करुन छोट्या कलशातून सूर्याला अर्घ्य द्यावे. मनापासून ही पूजा केली तर सुख समद्धी लाभते.

फेब्रुवारीचा महिना या ५ राशींसाठी शुभ, संपूर्ण महिन्यात होणार प्रगतीच प्रगती

पूर्व दिशेला अथवा ईशान्य दिशेच्या देवघरात सूर्य प्रतिमा ठेवून या प्रतिमेची पूजा करण्याची पद्धतही काही ठिकाणी रुढ आहे. तुळशी वृंदावनापुढे रथातून निघालेल्या सूर्याची प्रतिमा ठेवून तिची पूजा करतात. काही ठिकाणी तुळशीपुढे रथातून निघालेल्या सूर्याची रांगोळी काढली जाते. या दिवशी सूर्यदेवाला दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात मकरसंक्रातीला सुरू झालेले तिळगुळाचे आणि हळदीकुंकवाचे दैनंदिन समारंभ रथसप्तमीच्या दिवशी संपतात. रथसप्तमी ही वसंत पंचमीनंतर दोन किंवा तीन दिवसांनी येते. कोणार्क येथील सूर्य मंदिरात या दिवशी सूर्य नारायणाचा जन्मोत्सव साजरा होतो. वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव दक्षिण भारतातही साजरा करतात. या निमित्ताने दक्षिण भारतात समुद्राच्या किनारी असलेल्या गावांमध्ये ब्रह्मोत्सव साजरा करतात. रथसप्तमी निमित्त नर्मदा जयंतीही साजरी केली जाते. यानिमित्ताने अमरकंटक येथे यात्रेचे आयोजन केले जाते.

कधीही या ३ सवयींवर करू नका प्रेम, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

रथसप्तमी तिथी आरंभ : मंगळवार ४ फेब्रुवारी २०२५, पहाटे चार वाजून ३७ मिनिटांनी तिथी आरंभ
रथसप्तमी तिथी समाप्ती : बुधवार ५ फेब्रुवारी २०२५, रात्री उशिरा २ वाजून ३० मिनिटांनी

सूर्याची उपासना अथवा पूजा करण्यासाठी रथसप्तमी मंगळवार ४ फेब्रुवारी रोजी साजरी करावी. यासाठी घरात स्वच्छता करुन नंतर आंघोळ करावी. यानंतर सूर्याचे पूजन करावे. सूर्यदेवाचे नामस्मरण करावे. सूर्याला अर्घ्य द्यावे.

सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत

सकाळी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे.
पूर्वेकडे तोंड करून उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करावे.
अर्घ्य देताना गायत्री मंत्राचा जप करावा.
किमान ११ वेळ गायत्री मंत्र म्हणावा.

सूर्याची बारा नावं

ॐ मित्राय नम:
ॐ रवये नम:
ॐ सूर्याय नम:
ॐ भानवे नम:
ॐ खगाय नम:
ॐ पूष्णे नम:
ॐ हिरण्यगर्भाय नम:
ॐ मरिचये नम:
ॐ आदित्याय नम:
ॐ सवित्रे नम:
ॐ अर्काय नम:
ॐ भास्कराय नम:

गायत्री मंत्र

ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥
ॐ भूर्भुवः स्व:
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो
देवस्य धीमहि
धियो यो नः प्रचोदयात् ॥

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -