मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा सवयींचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे ज्या व्यक्तीचा आनंद हिरावून घेऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या सवयी असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने कधीही पैशाचा माज ठेवू नये. जी व्यक्ती पैशाचा माज ठेवतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. अशी मान्यता आहे की अशा लोकांपासून लक्ष्मी माता नाराज होते. या घरांमध्ये लक्ष्मी वास करत नाही.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नये. जी व्यक्ती उगाचच वायफळ खर्च करते. त्या व्यक्तींना नेहमी आर्थिक समस्या सतावतात. तसेच कर्जाच्या घेऱ्यात अडकतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीला कधीही गरजेपेक्षा जास्त कंजूस असता कामा नये. व्यक्तीने नेहमी गरजवंताना मदत केली पाहिजे. सोबतच धार्मिक कार्यामध्येही पैसा हवा तसा खर्च करावा.