मुंबई: शनिवारपासून फेब्रुवारीचा महिना सुरू होत आहे. या महिन्याची सुरूवात वसंत पंचमी, जया एकादशी, माघ पोर्णिमा आणि महाशिवरात्रीने होईल. ज्योतिषाचार्यांच्या मते हा महिना खूप खास मानला जातो. कारण या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचे गोचर होणार आहे.
या महिन्यात काही राशींना लाभ तर काहींना हानी होणार आहे. जाणून घेऊया फेब्रुवारी महिना कोणत्या राशींचा बँक बॅलन्स वाढणार आहे.
मेष
फेब्रुवारी महिना मेष राशींना करिअरमध्ये यश देणारा ठरणार आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवे रस्ते उघडतील. मेष राशीचे लोक चांगली बचत करू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण होईल.
मिथुन
नोकरीत नव्या संधी निर्माण होऊ शकतात. सर्व कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पार्टनरशिपमधून चांगले लाभ मिळू शकतात. पितृक संपत्तीतून खूप फायदा मिळू शकतो.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. त्यातून पैसा येत राहील. आर्थिक समस्या दूर होतील. या महिन्यात बचत करण्यास सक्षम राहाल.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा महिना आर्थिकदृष्ट्या चांगली राहील. व्यापार, व्यवसाय चांगला चालेल. नोकरीपेशा लोकांसाठी हा काळ चांगला आहे.
कुंभ
या महिन्यात कुंभ राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील. धनधान्यामध्ये वृद्धी होईल. धन बचत करण्यात सफल राहाल. परदेशी जाऊन धन कमावण्याचे योग बनत आहेत.