रजनीकांतच्या ’कबाली’ चित्रपटाच्या निर्मात्याने केली आत्महत्या

  54

अमली पदार्थ प्रकरणात केली होती अटक


पणजी : दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलगु चित्रपट निर्माता के. पी. चौधरी उर्फ सुनकारा कृष्णा प्रसाद चौधरी याने गोव्यात आत्महत्या केली आहे. के. पी चौधरी याला २०२३ मध्ये अमली पदार्थ प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याने गोव्यात आत्महत्या करत आपले जीवन संपवले.


के पी चौधरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक नामवंत निर्माता असून त्याने मेगास्टार रजनीकांत यांच्या ’कबाली’ या चित्रपटाची निर्मिती केली होती. २०२३ मध्ये त्याला हैदराबाद पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती.


टॉलीवुड आणि कॉलीवुडमध्ये ड्रग्जचा धंदा करण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. चौधरीचा मास्टर माईंड एडविन न्युनिस याच्याशी देखील संबंध असल्याचे उघडकीस आले होते. त्याच्यावर कर्ज खूप होते. कर्ज फेडण्याचा त्याच्यावर दबाव होता. अशातच, कोरोना काळात सगळं ठप्प झाल्यानंतर तो ड्रग्जच्या धंद्यात गुंतला. यातील कमाईतून तो त्याचा उदरनिर्वाह करत होता.



यानंतर चौधरी काही दिवसांपूर्वी गोव्यात शिफ्ट झाला होता व येथेच त्याने क्लब देखील सुरु केला. पण या व्यवसायात देखिल तोटा झाल्याने चौधरी आर्थिक समस्यांचा सामना करत होता. या घटनेनंतर चौधरी खचला होता. शिवाय आर्थिक अडचणींचा देखील सामना करत असल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली आहे.


के. पी. चौधरी याने रजनीकांत यांच्या प्रसिद्ध कबाली चित्रपटासह विविध हीट चित्रपटांची निर्मिती केली आहे. यात गब्बर सिंग, अर्जुन सुरावरम यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे. चौधरी याने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तेलगु, तामिळ सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Comments
Add Comment

MLA Crime news : आमदारपुत्राच्या बंगल्यातून २० वर्षीय तरुणीचा झाडाला लटकलेला मृतदेह; हत्या की आत्महत्या?

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील खरगापूर विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार चंदा सिंह गौर

नेपाळमार्गे बिहारमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी, पोलिसांनी दिला हायअलर्ट

पाटणा : पाकिस्तान पुरस्कृत जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या किमान तीन दहशतवाद्यांनी नेपाळमार्गे

पंजाबमध्ये पुराचा हाहाकार, नवोदय विद्यालयात ४०० मुले अडकली; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये संताप

गुरुदासपूर: पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हिमाचल व जम्मू-काश्मीरमधून

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत