नवीन किया सिरॉस लाँच

  106

मुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ८.९९ लाख रूपयांपासून सुरू होणाऱ्या आकर्षक किमतीत नवीन किया सिरॉस लाँच करण्‍यासह मध्‍यम व कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही श्रेणींमध्‍ये नवीन एसयूव्‍ही सेगमेंट दाखल केला आहे. कंपनीचे प्रीमियम मॉडेल्‍स ईव्‍ही९ व कार्निवलमधील डिझाइनमधून प्रेरणा घेत सिरॉसमध्‍ये अत्‍याधुनिक तंत्रज्ञान, प्रीमियम आरामदायीपणा व आकर्षक डिझाइनचे एकत्रिकरण केले आहे.



भारतात, विशेषत: वेईकल्‍सकडून अधिक अपेक्षा करणारे तरुण, तंत्रज्ञानप्रेमी व साहसी ड्रायव्‍हर्समध्‍ये एसयूव्‍हींप्रती मागणी वाढत आहे. या नव्या मागणीला प्रतिसाद देण्याची नवी उत्पादने लाँच केल्याचे किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर जून्‍सू चो म्‍हणाले. नव्या वाहनांमध्ये पर्यावरणाला अनुकूल असे इंटेरिअर आहे. वाहनाची रचना अतिशय आरामदायी आण आधुनिक अशी आहे.



अद्वितीय तंत्रज्ञान व स्‍मार्ट कनेक्‍टीव्‍हीटी :

  1. किया सिरॉसमध्‍ये सेगमेंट-फर्स्‍ट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपेडट सिस्‍टम आहे, जी ऑटोमॅटिकली १६ कंट्रोलर्सचे अपडेट करते, ज्‍यासाठी डिलरशिपला भेट देण्‍याची गरज नाही. हे इनोव्‍हेशन सामान्‍यत: लक्‍झरी वेईकल्‍समध्‍ये दिसून येते.

  2. किया कनेक्‍ट २.० सिस्‍टममध्‍ये ८० हून अधिक वैशिष्‍ट्यांची व्‍यापक श्रेणी आहे, जी विनासायास कनेक्‍टीव्‍हीटी आणि इंटेलिजण्‍ट वेईकल मॅनेजमेंटच्‍या माध्‍यमातून ड्रायव्हिंग अनुभव अधिक उत्‍साहित करते.

  3. कियाने किया कनेक्‍ट डायग्‍नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्‍यांना दूरूनच त्‍यांच्‍या वेईकलच्‍या स्थितीचे मूल्‍यांकन करण्‍याची सुविधा देते आणि किया अडवान्‍स्‍ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्‍लेसमेंट्स व मेन्‍टेनन्‍स अशा आवश्‍यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्‍यामधून विनासायास मालकीहक्‍काची खात्री मिळते.




प्रीमियम आरामदायीपणा व एैसपैस इंटीरिअर्स :

२,५५० मिमी व्‍हीलबेससह किया सिरॉस प्रवाशांच्‍या आरामदायीपणाला प्राधान्‍य देते. ७६.२ सेमी (३० इंच) त्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्‍प्‍ले पॅनेल कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीटप्रमाणे सेवा देते, ज्‍यामधून विनासायास डिजिटल इंटरफेस मिळते.

प्रमुख आरामदायी वैशिष्‍ट्ये पुढीलप्रमाणे :

  1. समर्पित ५-इंच क्‍लायमेट कंट्रोल डिस्‍प्‍ले, जे जलदपणे व सहजपणे क्‍लायमेट सेटिंग्‍ज देते.

  2. वायरलेस अॅप्‍पल कारपले व अँड्रॉईड ऑटोसह सर्वोत्त्‍म ऑडिओ अनुभवासाठी हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्‍पीकर साऊंड सिस्टम.

  3. रिअर सीट व्‍हेंटिलेशन, पुढील आसनांपर्यंत आरामदायीपणा.

  4. स्‍लायडिंग व रिक्‍लायनिंग ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स ज्‍या स्थिर बूट स्‍पेस आणि सुधारित प्रवासी आरामदायीपणा देतात.

  5. ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, जे केबिनमध्‍ये हवा खेळती राहण्‍याचा अनुभव देते.


सुरक्षितता व कार्यक्षमता :

  1. किया सिरॉसमध्‍ये लेव्‍हल २ अडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस) आहे, ज्‍यामध्‍ये १६ ऑटोनॉमस सुरक्षितता वैशिष्‍ट्ये आणि सर्वसमावेशक २० रॉबस्‍ट सेफ्टी पॅकेज आहे.

  2. स्‍मार्ट क्रूझ कंट्रोलसह स्‍टॉप अँड गो

  3. फ्रण्‍ट कोलिजन वॉर्निंगसह अव्‍हॉयडण्‍स असिस्‍ट

  4. लेन किप असिस्‍ट आणि लेन फॉलो असिस्‍ट

  5. ३६०-डिग्री कॅमेरासह ब्‍लाइण्‍ड व्‍ह्यू मॉनिटर

  6. इलेक्‍ट्रॉनिक स्‍टेबिलिटी कंट्रेाल आणि हिल स्‍टार्ट असिस्‍ट कंट्रोल

  7. सुधारित संरक्षणासाठी सहा एअरबॅग्‍ज

  8. एबीएस

  9. कियाच्‍या ‘ओपोझिट्स युनायटेड' डिझाइन तत्त्वामधून प्रेरित आकर्षक एक्‍स्‍टीरिअरला पूरक सिग्‍नेचर स्‍टारमॅप एलईडी लायटिंग, डिजिटल टायगर फेस, आर१७ (४३.६६ सेमी) क्रिस्‍टल-कट अलॉई व्‍हील्‍स आणि शक्तिशाली स्‍टान्‍स आहे.


इंजिन व व्‍हेरिएण्‍ट्स :

  1. किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे:

  2. स्‍मार्टस्‍ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (८८.३ केडब्‍ल्‍यू/१२० पीएस, १७२ एनएम)

  3. १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (८५ केडब्‍ल्‍यू/११६ पीएस, २५० एनएम)

  4. दोन्‍ही इंजिन्‍स मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन पर्यायांसोबत कियाचे ६एमटी कन्फिग्‍युरेशन असलेल्‍या पहिल्‍याच स्‍मार्टस्‍ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्‍यात आले आहेत.

  5. सिरॉस एचटीके, एचटीकेक+, एचटीएक्‍स, एचटीएक्‍स+ या चार ट्रिम्‍समध्‍ये, तसेच ग्‍लेशियर व्‍हाइट पर्ल, स्‍पार्कलिंग सिल्‍व्‍हर, प्‍यूटर ऑलिव्‍ह, इंटेन्‍स रेड, फ्रॉस्‍ट ब्‍ल्‍यू, अरोरा ब्‍लॅक पर्ल, इम्‍पेरिअल ब्‍ल्‍यू आणि ग्रॅव्हिटी ग्रे या आठ रंगांच्‍या पर्यायांमध्‍ये उपलब्‍ध आहे.

  6. किया सिरॉस नाविन्‍यपूर्ण मालकीहक्‍क प्रोग्राम्‍सची श्रेणी सादर करत आहे, जी ग्राहक अनुभव उत्‍साहित करण्‍यासाठी आणि मन:शांती देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. माय कन्‍वीनियन्‍स सिक्‍युअर अॅड-ऑन निवडक वेअर अँड टिअर पार्ट्ससाठी कव्‍हरेज देते, तर माय कन्‍वीनियन्‍स प्रोग्राम वैयक्तिक वापर आणि कार केअर गरजांनुसार मेन्‍टेनन्‍स पॅकेजेस् देते. अधिक सर्वसमावशेक संरक्षणासाठी माय कन्‍वीनियन्‍स प्‍लसमध्‍ये मेन्‍टेनन्‍स संरक्षण, विस्‍तारित वॉरंटी आणि रोडसाइड असिस्‍टण्‍सचा समावेश आहे.


किंमत व उपलब्‍धता :

किया सिरॉससाठी बुकिंग्‍ज भारतभरातील किया डिलरशिप्‍समध्‍ये किंवा कंपनीच्‍या ऑफिशियल वेबसाइटच्‍या माध्‍यमातून २५,००० रूपयांच्‍या किमान पेमेंटसह सुरू आहे. एडीएएस वैशिष्‍ट्ये ८०,००० रूपयांच्‍या अतिरिक्‍त खर्चामध्‍ये आणि टॉप ट्रिमच्‍या किंमतीपेक्षा अधिक रकमेमध्‍ये उपलब्‍ध आहेत.
Comments
Add Comment

जरांगेंच्या आंदोलनाला तिसऱ्या दिवशीही मिळाली परवानगी!

मुंबई: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईत लाखोंचा जनसमुदाय घेऊन आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) बेमुदत

मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा जातीचे जात

बीएमसीकडून आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांसाठी निरनिराळ्या नागरी सेवा-सुविधा

मुंबई : मराठा समाजबांधवांच्या मागण्यांच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई महानगरपालिका

शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा नाहीच

मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस मुदतवाढ

मुंबई : महाराष्ट्रातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व

Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा अरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं वक्तव्य!

अहिल्यानगर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला