Ajit Pawar : काॅन्ट्रॅक्टर लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद – अजित पवार

Share

पुणे : काॅन्ट्रॅक्टर राजकारणातून पदाधिकारी झाल्याने जनतेमध्ये चीड निर्माण होते. अर्थातच पक्ष प्रमुख म्हणून आम्ही जनतेच्या त्या प्रचंड रोषाचे धनी होतो. याशिवाय अधिकाऱ्यांनाही सरकारी कामे दर्जेदार करण्यास अडथळा निर्माण होतो. हा दुहेरी तोटा आता मला सहन होत नाही. मी आठ वेळा आमदार झालो, यापुढे मी कसाही आमदार म्हणून सभागृहात जाईल, परंतु काॅन्ट्रॅक्टर लोकांना राजकारणाचे दरवाजे बंद केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. अशी नवीन राजकीय भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरष्णे (ता.बारामती) येथील शेतकरी मेळाव्यात जाहीर केली. यावेळी उपस्थितांनी मात्र एकच टाळ्यांचा कडकडाट करीत पवारांच्या भूमिकेला पाठींबा दिला. शिरष्णे (ता.बारामती) येथे श्री स्वामी समर्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने नव्याने दूध बल्क कुलरची उभारणी केली आहे. त्या कामी संस्थेचे प्रमुख संतोष जाधव यांनी पुढाकार घेतला होता. या कुलरच्या उद्धाटन प्रसंगी अजित पवार बोलत होते.

बारामतीसह राज्यात काॅन्ट्रॅक्टर राजकारणातून पदाधिकारी होण्यासाठी इच्छुक असतात. ही संख्या मोठी होत चालली आहे. अर्थात हे लोकांना आवडत नसल्याचे लोकसभा आणि विधासभा निवडणूत प्रखरशाने जाणवले, असे सांगून पवार म्हणाले, ज्यांना राजकारण अथवा कार्यकर्ता व्हायच आहे, त्यांनी काॅन्टॅक्टर क्षेत्रात यायचे नाही.

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

55 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

1 hour ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

1 hour ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

2 hours ago