सुरत : सुरतमध्ये भीषण अपघात घडला आहे. बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान नाशिक मधून गुजरात राज्यात जाणाऱ्या खासगी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस उलटली. यात पाच प्रवासी मृत्यूमुखी झाले असून ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने या ठिकाणी ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे .
Jioचा ९९९ रूपयांचा रिचार्ज, ३ महिन्यांपेक्षा अधिक चालणार, मिळणार हे फायदे
सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे मध्य प्रदेश येथून चार धाम यात्रा करण्यासाठी निघालेली बस गुजरात राज्यातील माळेगावच्या घाटात पलटी झाल्याने यामध्ये रतनलाल देविराम जातव(४१), बोलाराम पोसाराम कुसवा (५५), गुहीबेन राजेशभाई यादव (६०), बिजेंद्र बादल यादव (५५), कमलेश भाई यादव (६०, सर्व राहणार मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे.
बसमधील जखमी २१ प्रवासी यांना शामगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर गंभीर जखमी २४ यांना अहावा येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस ज्यावेळी दरीमध्ये कोसळली त्यावेळी बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले असल्याचं प्रथमदर्शनी असलेल्या नागरिकांनी सांगितले. असे असले तरी अपघाताचे कारण अद्यापही अस्पष्टच.