PM Narendra Modi : अर्थसंकल्पावरून पंतप्रधानांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला डिवचले

दिल्ली : भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (दि १) रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. बारा लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने प्रत्येक घराघरात 'लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा' अशी भावना निर्माण झाली. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला टोला लगावलाय.



पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत होणाऱ्या निवडणुक प्रचार सभेत म्हणाले जर नेहरू यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर द्यावं लागत होतं. तर इंदिरा गांधी यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर १० लाख रुपये कर रुपात सरकारला द्यावे लागले असते.दहा ते १२ वर्षांपूर्वी जर तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर तुम्हाला २ लाख ६० हजार रुपये कर भरावा लागला असता.


काँग्रेस सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी कर आकारायची. पण भाजपच्या काळात तुम्हाला १२ लाख रुपयांच्या कमाईवर एकही रुपयाचा टॅक्सही लागणार नाहीये. शनिवारी सादर झालेला बजेट हा गरिबांसाठी होता, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.


दरम्यान काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं प्रत्येक स्तरावर स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

"लवकर तोडगा निघेल अशी आशा..." ट्रम्पच्या H-1B व्हिसा शुल्क वाढीवर भारताची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी एच-१बी व्हिसा अर्जांवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने पहिली

आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करणारा पहिला तरुण

नवी दिल्ली : मुंबईमध्ये राहणाऱ्या अंकुश गोयल याने भारतातील पहिला आयफोन १७ प्रो मॅक्स खरेदी करण्याचा मान मिळवला

दिल्लीमध्ये एआयचा गैरवापर करून महिलेवर अत्याचार

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये लाहोरी गेट परिसरात एआयचा गैरवापर करून एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. त्या महिलेने

झिरो बॅलेन्स अकाऊंट असूनही एटीएममधून काढले पैसे

एटीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरिकांची झुंबड जयपूर : राजस्थानच्या अलवर आणि मेवात परिसरात असलेल्या स्टेट बँक

Zubin Garg Death: गायक झुबीन गर्गचे अपघाती निधन की हत्या? व्यवस्थापक आणि आयोजकावर गुन्हा दाखल

गुवाहाटी: 'या अली', 'जाणे क्या होगा रामा रे', 'दिलरुबा' सारखे बॉलीवूड मधील सुपरहिट गाणी देणारा सुप्रसिद्ध

परावलंबन हाच देशाचा मोठा शत्रू; स्वावलंबी बनण्याचे पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : या जगात आपला कोणीही शत्रू नाही. भारताचा कोणी शत्रू असेल तर तो म्हणजे इतर देशांवरील आपलं अवलंबित्व. आपण