India Women Cricket Team : भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर मात करत अंडर-19 टी-20 वर्ल्डकपमध्ये विजयाचा झेंडा रोवला

मलेशिया : क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने दारुण पराभव केला. भारताने २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकले होते.



या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आफ्रिकेचा संपूर्ण संघ २० षटकांत फक्त ८२ धावा करून सर्वबाद झाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक २३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय, जेम्मा बोथा यांनी १६ आणि फेय काउलिंग यांनी १५ धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गोंगडी त्रिशाने ४ षटकांत फक्त १५ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शबनम शकीलनेही एका फलंदाजाची विकेट घेण्यात यश मिळवले.



२०२५ च्या अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने एकतर्फी सामने जिंकले. त्यांनी वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव करून सुरुवात केली. यानंतर, भारतीय संघाने मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला आणि नंतर श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला. त्याच वेळी, त्यांनी बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि स्कॉटलंडविरुद्ध १५० धावांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडचा ० विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता अंतिम सामनाही सहज जिंकला आहे. दरम्यान आता क्रिकेट चाहते भारतीय महिला संघाच्या विजयावर खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या