मलेशिया : क्रिकेट विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताने सलग दुसऱ्यांदा महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक जिंकला आहे. टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ९ विकेट्सने दारुण पराभव केला. भारताने २०२३ मध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचे पहिले विजेतेपद जिंकले होते.
Vitthal Rukmini Vivah Sohla : पंढरपुरात रंगला विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा!
या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आफ्रिकेचा संपूर्ण संघ २० षटकांत फक्त ८२ धावा करून सर्वबाद झाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक २३ धावा केल्या. त्यांच्याशिवाय, जेम्मा बोथा यांनी १६ आणि फेय काउलिंग यांनी १५ धावा केल्या. दुसरीकडे, भारताकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. गोंगडी त्रिशाने ४ षटकांत फक्त १५ धावा दिल्या आणि ३ विकेट्स घेतल्या. त्यांच्याशिवाय वैष्णवी शर्मा, आयुषी शुक्ला आणि पारुनिका सिसोदिया यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. शबनम शकीलनेही एका फलंदाजाची विकेट घेण्यात यश मिळवले.
Lavni King Ashish Patil : सुप्रसिद्ध लावणीकिंग आशिष पाटीलवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!
२०२५ च्या अंडर १९ महिला टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने एकतर्फी सामने जिंकले. त्यांनी वेस्ट इंडिजचा ९ गडी राखून पराभव करून सुरुवात केली. यानंतर, भारतीय संघाने मलेशियाचा १० विकेट्सने पराभव केला आणि नंतर श्रीलंकेचा ६० धावांनी पराभव केला. त्याच वेळी, त्यांनी बांगलादेशविरुद्ध 8 विकेट्सने आणि स्कॉटलंडविरुद्ध १५० धावांनी विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी उपांत्य फेरीत इंग्लंडचा ० विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्यानंतर आता अंतिम सामनाही सहज जिंकला आहे. दरम्यान आता क्रिकेट चाहते भारतीय महिला संघाच्या विजयावर खुश झाले आहेत.