
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लावणीकिंग आशिष पाटील यांच्यावर फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण कलमे यांनी आशिष पाटील यांच्यावर सांस्कृतिक शोचे नाव आणि संकल्पनेची चोरी करून तो स्वतःचा शो म्हणून बनविल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, प्रवीण कलमे यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये 'वर्ल्ड ऑफ स्ट्री' या बहुचर्चित डान्स शोचे आयोजन अमृतकला स्टुडिओच्या सहकार्याने केले होते. या शोचे नृत्यदिग्दर्शन व दिग्दर्शन आशिष पाटील यांनी केले. या दरम्यान प्रवीण कलमे यांनी लावणी व इतर नृत्यप्रकार एकत्र करून ‘सुंदरी’नावाच्या लावणी या फ्युजन सांस्कृतिक कार्यक्रमाची संकल्पना आशिष पाटील यांच्या समोर मांडली होती.

सुरत : सुरतमध्ये भीषण अपघात घडला आहे. बोरगाव-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरील माळेगावच्या घाटात रविवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान नाशिक मधून ...
२९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रवीण कलमे यांनी ‘सुंदरी’ नावाचा ट्रेडमार्क मनोरंजन सेवांच्या नोंदणीसाठी अर्ज करून आवश्यक शुल्क भरले होते. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये त्यांना धक्का बसला, जेव्हा आशिष पाटील यांनी ‘सुंदरी: लावणीचा इतिहास’ या नावाने सांस्कृतिक कार्यक्रम ६ फेब्रुवारी रोजी नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात आयोजित केला असल्याचे समजले.
प्रवीण कलमे यांचा दावा आहे. की ‘सुंदरी’या नावाचा ट्रेडमार्क आणि संकल्पना त्यांची असून आशिष पाटील यांनी ती चोरून स्वतःच्या नावावर बनवून नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) येथे ६ फेब्रुवारी रोजी सादर करीत आहे आणि सदर कार्यक्रम ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करते. परिणामी, याबाबत प्रवीण कलमे यांनी मुंबई उच्च न्यायालयात ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन केल्याबाबत वाणिज्यिक बौद्धिक संपदा (Commercial IP Suit) न्यायालयीन केस दाखल केली आहे, तसेच अंतिम निर्णयापूर्वी पुढील नुकसान टाळण्यासाठी तात्कालिक मदतीसाठी अर्ज केला आहे.