सचिन तेंडुलकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

  108

बुमराह-मंधानाचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मान, रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान


मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सचिन तेंडुलकरने हा पुरस्कार स्वीकारताना बीसीसीआयचे आभार मानले. मुंबईत बीसीसीआयच्या नमन पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्यासाठी भारताचे अनेक आजी-माजी खेळाडू उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यात २०२३-२४ या मोसमात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.


सचिनला आयसीसीचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जय शाह यांच्याकडून हा खास पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिनला हा खास पुरस्कार देताना सर्व उपस्थितांनी उभं राहून त्याचे कौतुक केलं. याशिवाय बीसीसीआयने सचिनसाठी एक खास व्हीडिओ देखील तयार केला होता. जो पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी दाखवण्यात आला. यावेळी त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

भारत आणि इंग्लंड संघात रविवारी (२ फेब्रुवारी) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर टी२० मालिकेतील शेवटचा सामना होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ मुंबईत असल्याने या दोन्ही संघातील सदस्यही पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी उपस्थित होते.

सचिनची कारकीर्द


वयाच्या १६ व्या वर्षी १९८९ मध्ये पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या सचिनने दोन दशके भारतीय क्रिकेटची सेवा केलेली आहे. २०११ मध्ये मायदेशात आणि तेही मुंबईत त्याचे विश्वविजेतेपदाचे स्वप्न साकार झाले होते. याच मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा निरोपही घेतला होता.


सचिनने २०० कसोटींसह एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या सचिनच्या नावावर विक्रमांचेही विक्रम झालेले आहेत. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा असे विक्रम त्याच्या नावावर आहेत. २०० कसोटी आणि ४६३ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या सचिनने यात अनुक्रमे १५,९२१ आणि १८,४२६ धावा केलेल्या आहेत; मात्र त्याच्या नावावर एकमेव ट्वेन्टी-२० सामना आहे.

बीसीसीआयने वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मागच्या वर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान केला. यावेळी जसप्रीत बुमराह आणि स्मृती मंधाना यांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून सन्मान करण्यात आला. रविचंद्रन अश्विनला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्फराज खानला सर्वोत्कृष्ट मेन्स डेब्यू तर आशा शोभनाला सर्वोत्कृष्ट महिला डेब्यू पुरस्कार मिळाला. महिला क्रिकेटमध्ये मंधाना सर्वोत्तम फलंदाज आणि दीप्ती शर्मा सर्वोत्तम गोलंदाज ठरली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शशांक सिंगला सर्वोत्कृष्ट व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू आणि तनुष कोटियनला रेड बॉल सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

बीसीसीआयचे पुरस्कार विजेते खेळाडू -

सी. के. नायुडू जीवनगौरव पुरस्कार - सचिन तेंडुलकर

पॉली उम्रीगर ट्रॉफी (सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू) - जसप्रीत बुमराह

सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू - स्मृती मानधना

आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक विकेट्स (महिला) - दिप्ती शर्मा (६ सामन्यांत १३ विकेट्स)

आंतरराष्ट्रीय वनडेत सर्वाधिक धावा (महिला) - स्मृती मानधना (१३ सामन्यांत ७४७ धावा)

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष - सर्फराज खान

सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला - आशा शोभना

बीसीसीआय विशेष पुरस्कार - आर अश्विन

एमए चिदंबरम ट्रॉफी (U19 कुच बिहार ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स)- विष्णू भारद्वाज

एमए चिदंबरम ट्रॉफी (U19 कुच बिहार ट्रॉफी सर्वाधिक धावा) - काव्या तेवोतिया

जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्तम महिला ज्यूनियर देशांतर्गत क्रिकेटपटू) - ईश्वरी अवसरे

जगमोहन दालमिया ट्रॉफी (सर्वोत्तम महिला सिनियर देशांतर्गत वनडे क्रिकेटपटू) - प्रिया मिश्रा

जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स) - एच जग्गनाथ

जगमोहन दालमिया ट्रॉफी (U16 विजय मर्चंड ट्रॉफी सर्वाधिक धावा) - एल रायचंदानी

एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स प्लेट ग्रुप) - नेईझेको रुप्रओ

एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स एलिट ग्रुप) - पी विद्युत

एमए चिदंबरम ट्रॉफी (U23 कर्नल सीके नायडू ट्रॉफी सर्वाधिक धावा एलिट ग्रुप) - अनिश केव्ही

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स प्लेट ग्रुप) - तनय त्यागराजन

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा प्लेट ग्रुप) - अग्नी चोप्रा

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक विकेट्स एलिट ग्रुप) - आर. साई किशोर

माधवराव सिंधिया पुरस्कार (रणजी ट्रॉफी सर्वाधिक धावा एलिट ग्रुप) - रिकी भूई

लाला अमरनाथ पुरस्कार (मर्यादीत षटकांच्या देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू) - शशांक सिंग

लाला अमरनाथ पुरस्कार (रणजी ट्रॉफीतील सर्वोत्तम अष्टपैलू) - तनुष कोटियन

देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम पंच - अक्षय तोत्रे

सर्वोत्तम संघ - मुंबई
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल