दिल्ली : रणजी ट्रॉफीमध्ये विराट कोहलीच्या पुनरागमनाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, कालपासून (दि. ३०) दिल्लीचा संघ रेल्वे विरुद्ध सामना खेळत आहे. यामध्ये विराट कोहलीला पाहण्यासाठी चाहत्यांनी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.मात्र, चाहत्यांची आता निराशा झाली आहे. रेल्वे विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. कोहलीला हिमांशू सांगवानने बाद केले.
हरवलेली लय परत मिळवण्यासाठी विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसत आहे. पण इथेही त्याची बॅट शांत राहिली. त्याने ५व्या चेंडूवर एक धाव घेत आपले खाते उघडले. २८व्या षटकात त्याने हिमांशूला चौकारही लगावला. पण पुढे जाऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा अंदाज चुकला आणि चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि थेट स्टंपवर गेला.
Mumbai News : मुंबई हादरली! दादर स्टेशनला उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह
कोहलीने १५ चेंडूंचा सामना केला आणि १ चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. त्याला बाद करताना हिमांशू सिंगला खूप आनंद झाला असावा. पहिले म्हणजे त्याने विराट कोहलीची मोठी विकेट घेतली आणि दुसरे म्हणजे त्याने इतक्या मोठ्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. शुभमन गिल आणि जडेजा वगळता रणजी करंडक सामन्यात कोणीही विशेष काही करताना दिसत नाही आहे.