स्वयंपाक करताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी थोडक्यात वाचली

नाशिक : नाशिक शहरातील अंबड परिसरात असलेल्या चुंचाळे परिसरातील एक गृहिणी स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच जोरात फुटल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गॅस शेगडीवरील काच फुटल्यामुळे मोठा हादरा झाला.


याबाबत अधिक माहिती अशी की चुंचाळे परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या सरोदे संकुलातील रुम नंबर येथे रहाणारे इक्बाल पिंजारी यांनी सन गेल्या दोन वर्षांपुर्वी कामटवाडे शिवारातील कोमल टॉवर येथे असलेल्या नाकोडा होम अप्लायन्स येथुन प्रेस्टीज कंपनीची ५ हजार १०० रुपये किंमतीची गॅस शेगडी विकत घेतली आहे इक्बाल पिंजारी यांची पत्नी आपल्या स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना गॅस शेगडीवर असलेली काच अचानक फुटली यावेळी स्वयंपाक घरातील पोळीच्या पिठासह भाजी तसेच संपुर्ण घरात काचेचे तुकडे उडले होते.


गॅस शेगडीवरील काच फुटल्याने मोठा आवाज झाला आणि त्या जागेवर धूरही पसरला. मात्र, यावेळी गृहिणीने चपळाई दाखवत स्वत:चा बचाव केला आणि किचनमधून सुरक्षितपणे बाहेर पडली.हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला. काही नागरिकांनी सुरक्षिततेसाठी गॅस लाइन बंद केली त्यामुळे मोठा अनर्थ टाळला आहे .


गॅस शेगडीवरील काच फुटण्याची ही घटना स्वयंपाकघरातील सुरक्षिततेची महत्त्वाची आठवण करून देते. गॅस शेगडीच्या सुरक्षिततेचे पालन करणे, काचेच्या भागांची नियमित तपासणी करणे, तसेच गॅस वापरण्याची काळजी घेतली पाहिजे, अशी सूचना तज्ञांनी दिली आहे.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे नागरिकांना गॅस वापराबाबत अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे.

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला माणगाव तालुक्यात ७ मार्चपासून सुरुवात

माणगाव : माणगाव तालुक्यातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि महिलांना विविध प्रकारचे शासकीय दाखले व महसूल विषयक

ST Bus : एसटीत मद्यपानास 'शून्य सहनशीलता'; चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

— परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सेवेत असताना

Nagpur Crime : पिचकारी मारली म्हणून आजीने थेट नातवाच्या अंगावर ओतले गरम पाणी; व्हिडिओ व्हायरल

नागपूर : होळीचा सण म्हणजे रंगाचा आणि पाण्याचा त्याशिवाय होळी ही अपूर्ण, अशीच होळी खेळताना नातवाने आजीवर पिचकारी

Pune Crime: बर्थडे पार्टीत सनमचा मृत्यू, शरीरात आढळलं पुरुषाचं हृदय; थरारक प्रकरण 13 वर्षानंतरही रहस्यच

पुणे: भारतीय गुन्हेगारी इतिहासातील सर्वात रहस्यमय आणि अंगावर शहारे आणणारं प्रकरण म्हणून 'सनम हसन केस' ओळखली जाते.

Pune: लेकीची छेड काढणाऱ्याला वडिलांनी दिला चोप; पुण्यातील नामांकित कॉलेजमधील संतापजनक घटना

पुणे: पुण्यातील नामांकित एमआयटी एडीटी (MIT ADT) कॉलेज परिसरात एक संतापजनक घटना घडली. इथं एका विद्यार्थिनीच्या

मुंबई उपनगरातील बांग्लादेशींवर नजर ठेवण्यासाठी विधानसभा निहाय समित्या गठित; मंगलप्रभात लोढा यांनी दिली माहिती

मुंबई: मुंबईतील वाढत्या बांग्लादेशींना हुडकून काढून त्यांना पुन्हा त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी विशेष