मुंबई : सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. सराफा बाजारात गुरुवारी ८३ हजार ८०० रुपये या दराने सोने विकले गेले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. याआधी सोन्याचा दर ८३ हजार ७५० रुपये होता. एका दिवसांत सोन्याच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ८०० रुपये आहे. याआधी बुधवारी ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ७५० रुपये होता. मुंबईत ९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या दरातही ५० रुपयांची वाढ झाली. बुधवारी ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ३५० रुपये होता. तर गुरुवारी ९९.५ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ८३ हजार ४०० रुपये झाला.
आर्थिक सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय ? कधी सादर होणार हा अहवाल ?
वायदे बाजारात सोन्याचा ८२ हजार ०३९ रुपयांवर उपघडला. चांदीचा दर वायदे बाजारात ९२ हजार १११ रुपयांवर आहे. देशांतर्गत सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ८४ हजार ३३० रुपयांवर तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७७ हजार ३३० रुपयांवर आणि एक किलो चांदीचा दर ९९ हजार ५५० रुपयांवर जाऊन पोहोचला.