उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेतर्फे राज्यभरात साजरा होणार ‘कॉमन मॅन दिन’

  120

मुंबई : शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून युवासेनेतर्फे रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राज्यभरात ‘कॉमन मॅन दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या माध्यमातून राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी ६१ सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान युवासेनेतर्फे करण्यात येणार आहे.


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी युवासेनेतर्फे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. यंदाच्यावर्षीही या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येत आहे. सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख संपूर्ण देशभरात पसरली. सुरुवातीला CM Eknath Shinde अर्थात Common Man आणि आता DCM Eknath Shinde अर्थात Dedicated to Common Man ही बिरुदावली जनतेने आपसूक साहेबांना दिलेली आहे.



शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, युवा वर्ग आणि विद्यार्थी या प्रत्येक समाजघटकासाठी अहोरात्र तत्पर राहण्याचे कार्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने करत आहेत. “सर्वसामान्यांचे हित सर्वतोपरी” साहेबांचे हे ब्रीदवाक्य जोपासण्यासाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता बांधील आहे. याच जाणिवेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ हा दिवस ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संकल्पनेव्दारे युवासेनेतर्फे राज्यभरातील ३६ जिल्ह्यातील ६१ ‘कॉमन मॅनचा’, सर्वसामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या ६१ सन्मानमूर्तींमध्ये शेतकरी, कष्टकरी, वारकरी, लाडक्या बहिणी, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, असंघटीत कामगार, विद्यार्थी इत्यादी सर्वसामान्य नागरिकांचा समावेश असणार आहे. यावर्षीपासून प्रत्येक वर्षी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस यापुढे महाराष्ट्रात ‘कॉमन मॅन दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढे यांनी केले आहे.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस येत्या ९ फेब्रुवारी रोजी जल्लोषात साजरा होत असतानाच सामाजिक जाणिवेतून सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहण्याचा साहेबांचा आदर्श जोपासण्याचा निर्णय युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक आणि युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे यांच्यातर्फे घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या नियोजनासंदर्भातील विस्तृत माहिती युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश परिषा प्रताप सरनाईक यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही