मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु होणार आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी याबाबत घोषणा केली. तसेच या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी त्यांनी दत्तक घेतले आहेत.
Aadhaar card : आजपासून महाराष्ट्रातील सगळ्या पोर्टवर आधार कार्ड अनिवार्य
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मासेमारी करणाऱ्या प्रत्येक खलाशाकडे आधार कार्ड आणि मासेमारी नौकेचा नोंदणी क्रमांक आवश्यक
मुंबई : महाराष्ट्र राज्याची ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येते आहे. मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे तीस हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे. तर सफारीसाठी प्रकल्प उभारण्यासाठी सुमारे पाच कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात वीस लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, अशी माहिती देऊन मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी मंत्री ॲड.शेलार यांच्यासमोर सादरीकरण केले. यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी बिबट्याची सफर सुरू करण्याचे निर्देश दिले. लागणारा निधी वन खात्याकडून आणि जिल्हा नियोजन समितीमधून आम्ही देऊ, असे त्यांनी सांगितले. याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
Mumbai Metro : मेट्रो २ ब प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात २४८ कोटींची वाढ!
मुंबई : नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्यासाठी मेट्रो २ ब (Metro 2 B) डीएन नगर ते मंडाळे असा मेट्रो प्रकल्प सुरु आहे. मात्र बांधकाम कोसळणे, कामात अडचण, ...
उद्यानात "भारत आणि भारती" हे तीन वर्षाचे दोन सिंह २६ जानेवारी रोजी गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड.शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च मंत्री ॲड.शेलार वैयक्तिकरित्या करणार आहेत.
एमएमआर ते मुंबई, नवी मुंबईशी महामार्ग जोडणारा मास्टर प्लान तयार
एमएमआरमधून थेट मुंबई गाठता येणार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगरला थेट मुंबई, नवी मुंबईशी ...
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ४०० वन मजूर आहेत. ते गस्तीचे काम करतात. यात प्रामुख्याने आदिवासी आहेत. तसेच मानवी वस्तीमध्ये वन्य प्राणी घुसल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी जाणारी ११ जणांचे पथक आहे. सगळ्यांचा प्राण्यांशी थेट संपर्क येतो. मात्र या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यात आलेला नाही, ही बाब मंत्री ॲड.शेलार यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने याबाबत निर्देश दिले व या सगळ्यांचा सुरक्षा विमा उतरवण्यास सांगितले. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही पण त्यांनी दिली.