मुंबई : नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ आणि जलद होण्यासाठी मेट्रो २ ब (Metro 2 B) डीएन नगर ते मंडाळे असा मेट्रो प्रकल्प सुरु आहे. मात्र बांधकाम कोसळणे, कामात अडचण, नियोजन नसणे अशा कारणोत्सव काम वेळेत पूर्ण होत नसल्याचे दिसत आहे. यामुळे मेट्रो २ ब डीएन नगर ते मंडाळे या मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात तब्बल २४८ कोटींची वाढ झाली आहे. (Mumbai Metro)
Mumbai News : मुंबई हादरली! दादर स्टेशनला उभ्या असलेल्या गाडीत आढळला मृतदेह
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सांगितल्यानुसार, मेट्रो २ ब मेट्रो प्रकल्प चार भागात विभाजित असून दिरंगाई बाबत तीनही कंत्राटदारास १.९२ कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या स्थापत्य कामाच्या खर्चात २४८ कोटींची वाढ झाल्याने आता खर्च ३३०४.८३ कोटी झाला आहे.
डीएन नगर ते बीकेसी एमटीएनएल
डीएन नगर ते बीकेसी एमटीएनएल पॅकेज सी १०१ अंतर्गत मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. यांस २८ मे २०२१ रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख २७ नोव्हेंबर २०२३ अशी होती. सध्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख ३० जून २०२५ अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च १३०७.८८ कोटी होता ज्यात ५५.५४ कोटींची वाढ झाली आहे. मे. जे.कुमार इंफ्राप्रोजेक्टस लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास १.३६ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन
बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन पॅकेज सी १०२ अंतर्गत मे.एनसीसी लि. यांस २ मे २०२२ रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख १ मे २०२५ अशी आहे. सद्या वाढीव मुदतवाढ दिली गेली आहे. या कामाचा अपेक्षित खर्च ७५९.६७ कोटी आहे. मे.एनसीसी लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास १४.९९ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो
चेंबूर डायमंड गार्डन ते मंडाळे पॅकेज सीए ७ अंतर्गत मे.एनसीसी लि. यांस १७ जानेवारी २०१९ रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख १६ जुलै २०२१ अशी आहे. सद्या वाढीव मुदतवाढ 30 जून 2025 अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च ४५८.९३ कोटी आहे ज्यात वाढीव खर्च हा १२२.७७ कोटी इतका झाला आहे. मे.एनसीसी लि. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास २९.५८ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.
मंडाळे कारशेड
मेट्रो २ ब साठी मंडाळे कारशेड पॅकेज सीए १४ अंतर्गत मे. अहलुवालिया इंडिया लिमिटेड यांस १७ जानेवारी २०१९ रोजी कार्यादेश देण्यात आले असून काम पूर्ण करण्याची तारीख १६ जुलै २०२१ अशी होती. सद्या वाढीव मुदतवाढ दिली असून ती तारीख ३० जून २०२५ अशी आहे. या कामाचा अपेक्षित खर्च ५३०.३२ कोटी होता ज्यात ६९.६८ कोटींची वाढ झाली आहे. मे. अहलुवालिया इंडिया लिमिटेडमे. तर्फे कामात करण्यात आलेल्या दिरंगाईमुळे त्यास १०.९७ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे. (Mumbai Metro)