आसारामवरील वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात

अहमदाबाद : एकेकाळी स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु अशी आसाराम बापूची ओळख होती. अनेकजण संत आसाराम बापू म्हणजे देवाचे रुप असे म्हणत होते. याच काळात आसाराम आणि त्याच्या मुलावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. अल्पवयीन पीडितेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी आढळल्यामुळे आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या वय आणि तब्येतीचे कारण देऊन जामिनावर तुरुंगाबाहेर आलेला आसाराम आता वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.



तब्बल अकरा वर्ष तुरुंगात काढल्यानंतर आसाराम बाहेर आला. काही काळ जोधपूरच्या आश्रमात वास्तव्य केल्यानंतर आसाराम अहमदाबादच्या आश्रमात विश्रांतीसाठी आला आहे. अहमदाबादमध्ये आसारामवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. जामिनावर असताच्या काळात तब्येत सुधारावी यासाठी आवश्यक ती काळजी घेत असलेला आसाराम वेबसीरिजमुळे नव्या चिंतेने ग्रासला आहे.



आसारामवरील 'सेंट ऑर सिनर ?' अर्थात 'संत की पापी ?' नावाच्या वेबसरिजमध्ये आसाराम ही व्यक्ती कशी लोकप्रिय झाली ? पुढे आरोप कसे होत गेले ? आसारामच्या अडचणी कशा प्रकारे वाढल्या ? न्यायालयात काय झाले ? आसाराम कोणत्या कारणामुळे दोषी ठरला ? आसारामला न्यायालयाने दिलेली शिक्षा अशा अनेक मुद्यांना वेबसीरिजमध्ये स्पर्श करण्यात आला आहे. या वेबसीरिजवर बंदी घालण्याची मागणी आसारामच्यावतीने त्याच्या वकिलाने केली आहे. वेबसीरिज विरोधात कायदेशीर लढा लढण्याची तयारी आसारामने सुरू केली आहे.



याआधी आसाराम विरोधात न्यायालयात उभ्या असलेल्या पीसी सोलंकी नावाच्या वकिलावर आधारित चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी याची प्रमुख भूमिका असलेला 'बस एक बंदा ही काफी है' हा चित्रपट मे २०२३ मध्ये आला. या चित्रपटाला आसाराम बापू न्यासाच्या (ट्रस्ट) वकिलाने विरोध केला होता. उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास नकार दिला. आसाराम खटल्याशी संबंधित आयपीएस अजयपाल लांबा आणि संजीव माथुर यांनी लिहिलेल्या 'गनिंग फॉर द गॉडमॅन' पुस्तकालाही आसारामकडून विरोध करण्यात आला होता. पण दिल्ली उच्च न्यायालयाने या पुस्तकाव बंदी घालण्यास नकार दिला होता. आता आसारामशी संबंधित वेबसीरिज वादाच्या भोवऱ्यात आहे. आधीचे न्यायालयीन घटनाक्रम बघता, वेबसीरिजवर बंदी येण्याची शक्यता अतिशय कमी आहे. यासाठी आसारामच्या समर्थकांमध्ये संदेश पसरवून वेबसीरिज बघितली जाऊ नये यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू झाले आहेत.

Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व