Raj Thackeray : “एका गाण्यासाठी चित्रपट पणाला…”; छावा चित्रपटातील लेझीम वादावर राज ठाकरेंनी मांडली भूमिका

मुंबई : 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी काही दिवसांआधी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच या चिपटासंदर्भात भाष्य केलं आहे.


मुंबईतील वरळीत मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरे ‘छावा’च्या ट्रेलरवरून सुरू असलेल्या वादावर मोकळेपणे व्यक्त झाले. राज ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे प्रेरणास्थान आहे. तर संभाजी महाराज आमचे बलिदान आहेत. 'छावा' चित्रपटाच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने वाद निर्माण झाला असल्याच मला अमेय खोपकर यांनी सांगितले. त्यासंदर्भात तुम्हला निर्मात्यांना भेटायचं आहे. त्यानंतर मी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. दुसऱ्या दिवशी ते मला भेटायला आहे. अर्थात लेझीम हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे आणि संभाजीराजेंनी कधीतरी हातात लेझीम घेतलंही असेल, काय माहिती? इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल. मी त्यांना विचारलं की, त्या एका गाण्याने चित्रपट पुढे सरकतोय का? की नुसतं सेलिब्रेशनचं गाणं आहे? त्यावर ते म्हणाले की फक्त सेलिब्रेशनचं गाणं आहे. मग म्हटलं, त्यासाठी चित्रपट कशाला पणाला लावताय?”, असं राज ठाकरे म्हणाले.



याविषयी ते पुढे म्हणाले, “आपल्याकडे हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय, सगळेच इतिहासतज्ज्ञ झाले आहेत, सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतायत सगळ्याबाबतीत. पण म्हटलं जेव्हा लोक चित्रपट पाहायला जाणार तेव्हा औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत, ते डोक्यात ठेवून जेव्हा लोकं जातील आणि ट्रेलरमध्ये लेझीम वगैरे दिसत असेल तर म्हटलं काढून टाका. ज्याने महात्मा गांधी चित्रपट केला. आपल्यासमोर महात्मा गांधींची काही आंदोलनं येतात. पण चित्रपट पाहायला गेल्यावर आपल्याला महात्मा गांधी दांडिया खेळताना दिसले, तर कसं वाटलं असतं? दिग्दर्शकांना तो सीन टाकायचाही असेल, पण महात्मा गांधींच्या हातात एकच काठी असल्याने दांडिया खेळता नाही आला. ते जर दोन काठ्या घेऊन चालले असते, तर कदाचित आला असता सीन. माहित नाही आपल्याला.”

Comments
Add Comment

‘दशावतार’ सिनेमाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ दिवसांत केली इतकी कमाई !

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळीच लाट घेऊन आलेल्या ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच

रजनीकांत होते 'दशावतार'साठी पहिली पसंत? दिग्दर्शकांचा मोठा खुलासा

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. तो चित्रपट म्हणजे 'दशावतार'! हा चित्रपट

दिशा पटानीच्या घरावर गोळीबार!

प्रेमानंद महाराजांचा अपमान केल्याच्या आरोपाखाली केला गोळीबार बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीशी संबंधित एक

TMKOC : ४५०० भागांचा टप्पा गाठत ‘तारक मेहता’ने रचला नवा विक्रम

मुंबई : टीव्ही मनोरंजनाच्या विश्वात लोकप्रिय मालिकांचा उल्लेख झाला, तर ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचं

‘तू माझा किनारा’ – क्रिस्टस स्टीफन यांची मराठी चित्रपटसृष्टीत भावनिक सुरुवात!

मुंबई : चित्रपट निर्माते क्रिस्टस स्टीफन हे आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून, त्यांचा पहिला मराठी

अभिनेत्री करिश्माने मारली चालत्या लोकलमधून उडी

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा शर्मा हिचा मुंबईतील चर्चगेट येथे अत्यंत गंभीर अपघात झाला. करिश्मा स्वतःने