नवी दिल्ली : आपला सचिन पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ८७५ दिवसांच्या विश्रांतीनंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीग या क्रिकेट स्पर्धेत खेळणार आहे. सचिन शेवटचा क्रिकेट सामना १ ऑक्टोबर २०२२ रोजी खेळला होता. यानंतर इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या निमित्ताने सचिन २२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्रीलंकेविरोधात मैदानात खेळताना दिसेल. हा सामना नवी मुंबई येथील डी. वाय पाटील स्टेडियम येथे होणार आहे. इंटरनॅशनल मास्टर्स लीग या स्पर्धेत अनेक निवृत्त झालेले क्रिकेटपटू खेळताना दिसतील. सचिन इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
Ranji Trophy 2025 : विराटला रणजी सामना खेळताना पाहण्यासाठी अरुण जेटली स्टेडियमवर तुफान गर्दी
इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५
- भारत, कर्णधार सचिन तेंडुलकर
- ऑस्ट्रेलिया, कर्णधार शेन वॉटसन
- श्रीलंका, कर्णधार कुमार संघकारा
- दक्षिण आफ्रिका, कर्णधार जॅक कॅलिस
- इंग्लंड, कर्णधार इऑन मॉर्गन
- वेस्ट इंडिज, कर्णधार ब्रायन लारा
सामने कुठे कुठे होणार ?
नवी मुंबई, राजकोट, रायपूर
पुण्यातील भारत – इंग्लंड सामन्यावर GBS चे संकट, प्रशासनाचा मोठा निर्णय
कशी होणार इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ ?
इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५ ही स्पर्धा राउंड-रॉबिन स्वरुपात खेळवली जाईल. नंतर बाद फेरी असेल. राउंड-रॉबिन प्रकारात प्रत्येक संघ इतर पाच संघांसोबत प्रत्येकी एक सामना खेळेल. या फेरीत सर्वाधिक गुण मिळवणारे चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. दोन उपांत्य सामने होतील. ही अर्थातच बाद फेरी असेल. या फेरीतील दोन विजेते १६ मार्च रोजी रायपूर येथे अंतिम सामन्यासाठी एकमेकांसमोर मैदानात येतील. स्पर्धा २२ फेब्रुवारी २०२५ ते १६ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे. सर्व वीस – वीस षटकांचे सामने असतील. सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० पासून सुरू होईल. सामन्यांचे प्रक्षेपण भारतात कलर्स सिनेप्लेक्स एसडी/एचडी आणि कलर्स सिनेप्लेक्स सुपरहिट्स या दोन टीव्ही चॅनलवर दिसेल. डिस्ने प्लस हॉटस्टार या अॅपवर सामन्याचे स्ट्रीमिंग बघता येईल.
वेळापत्रक – इंटरनॅशनल मास्टर्स लीग २०२५, सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० पासून सुरू
२२ फेब्रुवारी २०२५ – नवी मुंबई – भारत विरुद्ध श्रीलंका
२४ फेब्रुवारी २०२५ – नवी मुंबई – वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२५ फेब्रुवारी २०२५ – नवी मुंबई – भारत विरुद्ध इंग्लंड
२६ फेब्रुवारी २०२५ – नवी मुंबई – दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका
२७ फेब्रुवारी २०२५ – नवी मुंबई – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
२८ फेब्रुवारी २०२५ – राजकोट – श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१ मार्च २०२५ – राजकोट – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
३ मार्च २०२५ – राजकोट – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
५ मार्च २०२५ – राजकोट – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
६ मार्च २०२५ – राजकोट – श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज
७ मार्च २०२५ – राजकोट – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका
८ मार्च २०२५ – रायपूर – भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
१० मार्च २०२५ – रायपूर – श्रीलंका विरुद्ध इंग्लंड
११ मार्च २०२५ – रायपूर – वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
१२ मार्च २०२५ – रायपूर – इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया
१३ मार्च २०२५ – रायपूर – पहिला उपांत्य सामना
१४ मार्च २०२५ – रायपूर – दुसरा उपांत्य सामना
१६ मार्च २०२५ – रायपूर – अंतिम सामना