पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर जीबीएस अर्थात गुइलेन – बॅरे – सिंड्रोम या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यांना गुइलेन – बॅरे – सिंड्रोम हा आजार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला आहे. या रुग्णांच्या आणखी वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. रुग्णांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी उपचार सुरू आहेत. पण जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.
Jasprit Bumrah : बुमराहने कोरलं ‘आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कारावर नाव
प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये सर्वांना दर्जेदार पदार्थ मिळतील आणि पिण्यासाठी किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी मिळेल याची खबरदारी घेतली जाणार आहे. सामन्याची पूर्वतयारी म्हणून गवतावर फवारण्यासाठीही किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी वापरले जात आहे. स्टेडियममध्ये स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे.
IND vs ENG : राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा लाजिरवाणा पराभव
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. यामुळे मालिकेत भारताकडे २ – १ अशी आघाडी आहे. पुण्यातील सामना भारताने जिंकला तर शेवटचा सामना होण्याआधीच भारत ही मालिका ३ – १ अशी जिंकेल. पण पुण्यातील सामना बरोबरीत सुटला अथवा अनिर्णित राहिला किंवा कोणत्याही कारणाने रद्द झाला तर भारताकडे असलेली आघाडी कायम राहील. पुण्यातील सामना इंग्लंडने जिंकला तर तर पाहुणा इंग्लंड आणि यजमान भारत मालिकेत २- २ अशी बरोबरी साधतील. मालिकेत बरोबरी साधली गेली तर मुंबईतील सामना मालिकेच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.
पुण्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार
पुण्यातील खेळपट्टी आधी फलंदाजीला आणि नंतर फिरकीला मदत करेल, असा अंदाज आहे. दुसऱ्या डावाच्या सुमारास खेळपट्टी संथ होत जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे पुण्यातील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजीचा पर्याय निवडून खेळपट्टीचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याआधी राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही खेळपट्टी संथ झाली. यामुळे राजकोटमध्ये धावांचा पाठलाग करणे भारताला कठीण झाले आणि टीम इंडियाने सामना गमावला होता.
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रोमोमध्ये दिसला MS धोनी, व्हिडिओ व्हायरलं
भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी २० मालिका
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू
- पहिला सामना – कोलकाता – भारत ७ गडी राखून विजयी
- दुसरा सामना – चेन्नई – भारत २ गडी राखून विजयी
- तिसरा सामना – राजकोट – इंग्लंड २६ धावांनी विजयी
- चौथा सामना – पुणे – ३१ जानेवारी २०२५ रोजी होणार सामना
- पाचवा सामना – मुंबई – २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार सामना