Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंग न्यूजभारत - इंग्लंड सामन्यासाठी पुण्यातील वाहतूक मार्गांमध्ये बदल

भारत – इंग्लंड सामन्यासाठी पुण्यातील वाहतूक मार्गांमध्ये बदल

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना सुरू होत आहे. या सामन्याच्या निमित्ताने हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने निवडक वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहे. ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय.पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात येणार आहे.

Metro : मेट्रो पर्यवेक्षकाकडून २० लाखांच्या लोखंडाची चोरी!

मुंबईतून येणाऱ्या प्रेक्षकांनी द्रुतगती मार्गावरील देहूरोड एक्झिट मधून डावीकडे वळावे. त्यानंतर लगेच परत डावीकडे वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डी गावाच्या बाजूस असलेल्या सेवा मार्गाने स्टेडियम आणि पार्किंगकडे जावे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहने किवळे पुलावरुन मुकाई चौक येथून यू टर्न घेऊन कृष्णा चौक मार्गे एक्सप्रेस वे लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजूकडील सेवा मार्गाने स्टेडियम आणि पार्किंगकडे जाऊ शकतील, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. शितलादेवी मंदिराच्या डाव्या बाजूकडून लेखा फार्म मार्गे सेवा मार्गाने स्टेडियम आणि पार्किंगकडे जाता येईल, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले.

आला रे सचिन आला, आपला सचिन पुन्हा क्रिकेट खेळणार

सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे पुलाखालून कृष्णा हॉटेल शेजारुन मामुर्डी अंडर-पासच्या डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जाऊ शकतील. तसेच जुन्या मुंबई-पुणे हायवेने येणारी वाहने सेंट्रल चौक येथून यु टर्न घेवून साई नगर फाटा मार्गे पार्किंगच्या दिशेने जाऊ शकतील, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. मनाई – जुना मुंबई पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी असेल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Champions Trophy आधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

पुण्यातून येत असलेल्या वाहनांनी पुणे बंगलोर महामार्गावरुन आल्यास, पवनानदी पूल, हॉटेल सॅन्टोंसावरुन पुढे किवळे पुलावरुन वाहने डाव्या बाजूस वळावे आणि २०० मी. द्रुतगती मार्गाच्या डाव्या बाजूने असलेल्या सेवा मार्गाने स्टेडियम आणि पार्किंगकडे जावे; असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. निगडी, हँगिंग ब्रिज कडून येणाऱ्या वाहनांनी रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथून उजव्या बाजूस वळून परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजूस वळून सेवा मार्गाने स्टेडियम आणि पार्किंगकडे जावे; असे निर्देश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत. गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश दिला जाईल.

पुण्यातील भारत – इंग्लंड सामन्यावर GBS चे संकट, प्रशासनाचा मोठा निर्णय

मामुर्डी गावातील रुहिडा बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. या मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जाती; असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजूस येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील, असेही वाहतूक पोलिसांनी सांगितले. सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉपकडून किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनास वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येईल. या मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे शेजारील मामुर्डी गावचे बाजूस असलेल्या सेवा मार्गाने गहुंजे स्टेडियमकडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना ३१ जानेवारी रोजी दुपारी तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रवेश बंद असेल. वाहन धारकांनी आणि वाहन चालकांनी सूचनांचे, निर्देशांचे तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करुन वाहन चालवावे आणि सहकार्य करावे; असे आवाहन पुण्याच्या वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -