पुण्यातील भारत - इंग्लंड सामन्यावर GBS चे संकट, प्रशासनाचा मोठा निर्णय

पुणे : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील चौथा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावर जीबीएस अर्थात गुइलेन - बॅरे - सिंड्रोम या आजाराचे संकट घोंगावत आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांत १०० पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत, ज्यांना गुइलेन - बॅरे - सिंड्रोम हा आजार झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वैद्यकीय पथकाने काढला आहे. या रुग्णांच्या आणखी वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत. रुग्णांच्या तब्येतीला लवकर आराम पडावा यासाठी उपचार सुरू आहेत. पण जीबीएसचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. पुण्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.



प्रामुख्याने दूषित पाणी आणि शिळ्या अन्नातून जंतू पोटात जातात आणि ते आपल्या पेशींवर हल्ला करून त्या निकामी करतात. त्यामुळे जीबीएसचा धोका निर्माण होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर सामन्याच्या दिवशी स्टेडियममध्ये सर्वांना दर्जेदार पदार्थ मिळतील आणि पिण्यासाठी किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी मिळेल याची खबरदारी घेतली जाणार आहे. सामन्याची पूर्वतयारी म्हणून गवतावर फवारण्यासाठीही किमान तीन वेळा फिल्टर केलेले अतिशय शुद्ध पाणी वापरले जात आहे. स्टेडियममध्ये स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात आहे.



भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील पहिला आणि दुसरा सामना भारताने तर तिसरा सामना इंग्लंडने जिंकला आहे. यामुळे मालिकेत भारताकडे २ - १ अशी आघाडी आहे. पुण्यातील सामना भारताने जिंकला तर शेवटचा सामना होण्याआधीच भारत ही मालिका ३ - १ अशी जिंकेल. पण पुण्यातील सामना बरोबरीत सुटला अथवा अनिर्णित राहिला किंवा कोणत्याही कारणाने रद्द झाला तर भारताकडे असलेली आघाडी कायम राहील. पुण्यातील सामना इंग्लंडने जिंकला तर तर पाहुणा इंग्लंड आणि यजमान भारत मालिकेत २- २ अशी बरोबरी साधतील. मालिकेत बरोबरी साधली गेली तर मुंबईतील सामना मालिकेच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे.

पुण्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार

पुण्यातील खेळपट्टी आधी फलंदाजीला आणि नंतर फिरकीला मदत करेल, असा अंदाज आहे. दुसऱ्या डावाच्या सुमारास खेळपट्टी संथ होत जाईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे पुण्यातील सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजीचा पर्याय निवडून खेळपट्टीचा जास्तीत जास्त फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. याआधी राजकोटमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही खेळपट्टी संथ झाली. यामुळे राजकोटमध्ये धावांचा पाठलाग करणे भारताला कठीण झाले आणि टीम इंडियाने सामना गमावला होता.



भारत विरुद्ध इंग्लंड, पाच सामन्यांची टी २० मालिका
सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू

  1. पहिला सामना - कोलकाता - भारत ७ गडी राखून विजयी

  2. दुसरा सामना - चेन्नई - भारत २ गडी राखून विजयी

  3. तिसरा सामना - राजकोट - इंग्लंड २६ धावांनी विजयी

  4. चौथा सामना - पुणे - ३१ जानेवारी २०२५ रोजी होणार सामना

  5. पाचवा सामना - मुंबई - २ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार सामना


 
Comments
Add Comment

ALL T20 : आशियाई लेजेंड्स लीगमध्ये रायडू, पठाण, दिलशान चमकणार, झाम्बियात ३० जुलैपासून सीझन २ रंगणार

नवी दिल्ली : आशियाई लेजेंड्स लीगचा बहुप्रतीक्षित दुसरा सीझन जगभरातील क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करण्यासाठी

Commonweath Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठे बदल ! प्रमुख खेळांना वगळण्यात आले, भारतावर किती होणार परिणाम ?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. यंदाची स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या