मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.या स्पर्धेत ८ संघ खेळताना दिसणार आहेत.चॅम्पियन्स ट्रॉफी साठी सर्वचं क्रिकेटचाहते उत्सुक झाले आहेत. अशातच आता, चॅम्पियन्स ट्रॉफीचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये टीम इंडियाचा यशस्वी आणि माजी कर्णधार एमएस धोनी दिसत आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवीन प्रोमो आता समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एमएस धोनी बर्फाळ पर्वतांवर दिसत आहे. यामध्ये धोनी स्वतःला थंड करण्यासाठी भरपूर बर्फ वापरताना दिसत आहे. यावेळी धोनीला असे म्हणताना ऐकू येत होते की, “मी कर्णधार असताना शांत राहणे सोपे होते पण चाहते बनून चॅम्पियन्स ट्रॉफी पाहणे सोपे नव्हते.” धोनीचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.या प्रोमोमुळे क्रिकेटचाहत्यांचा उत्साह आणखी वाढणार आहे.
Captain Cool on the field 😌
Captain Cool as a fan 🥵With every match do-or-die in the #ChampionsTrophy, even @msdhoni needs a DRS (Dhoni Refrigeration System) to beat the heat! 👊
📺 #ChampionsTrophyOnJioStar STARTS WED, 19 FEB 2025! | #CaptainNotSoCool pic.twitter.com/nv1XXZoHht
— Star Sports (@StarSportsIndia) January 29, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी तब्बल ८ वर्षांनी होत आहे.ही स्पर्धा शेवटची २०१७ मध्ये खेळवण्यात आली होती. या काळात पाकिस्तानने अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. याशिवाय, टीम इंडियाने शेवटचे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. २०१३ मध्ये, जेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता, तेव्हा टीम इंडियाने हे विजेतेपद जिंकले होते.