'फसक्लास दाभाडे' कुटुंबाची युएई, गल्फमध्येही चर्चा

मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' हा बहुप्रतिक्षित चित्रपट वर्ल्डवाइड प्रदर्शित झाला असून हे दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाचे केवळ महाराष्ट्रातच नाही तर युएई, गल्फ कंट्रीजमध्येही ग्रँड ओपनिंग झाले आहे.


परदेशातही या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत असून पहिल्याच विकेंडला 'फसक्लास दाभाडे'ने महाराष्ट्रासह परदेशातही 'हाऊसफुल्ल'चे बोर्ड मिरवत करोडोंचा पल्ला गाठला आहे. दाभाडे कुटुंबातील लग्नकार्य, नात्यात आलेला दुरावा, गैरसमज, सामाजिक विचारसरणी, रूढी परंपरा अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने भाष्य करण्यात आले आहे.


खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट म्हणजे प्रत्येकासाठी मनोरंजनाची मेजवानी ठरत आहे. टी-सीरीज, कलर यल्लो प्रॉडक्शन आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे आणि राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते असणाऱ्या या चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओजने केले आहे.

Comments
Add Comment

ऐतिहासिक ‘टर्न टेबल शिडी’ वाहनाचे मुंबई अग्निशमन दलाकडून पुनर्जतन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी होणार अनावरण महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक गगराणी

मद्यपी चालकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करा!

मुंबई : कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या एसटीच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता तातडीने

‘मराठी भाषा’ ही नदीप्रमाणे सतत वाहणारी परंपरा

मुंबई : मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची नदीसारखी अविरतपणे वाहणारी सांस्कृतिक परंपरा आहे,

मुंबईत दिंडोशी मनपा वसाहतीत दूषित आणि पिवळसर पाण्याचा पुरवठा

​मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या 'पी पूर्व' (P-East) विभागांतर्गत येणाऱ्या गोरेगाव (पूर्व) येथील दिंडोशी मनपा वसाहत

प्रजासत्ताक दिनाला जोडून सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र, गोव्यातील बस आरक्षणात वाढ

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या लाँग विकेंडमुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील आंतरशहरी बस प्रवासात लक्षणीय वाढ होत

वीज वितरण क्षेत्राची कामगिरी राज्यभर सुधारली

राष्ट्रीय स्तरावर ऊर्जा क्षेत्र जास्त नफाक्षम मुंबई : वीज वितरण कंपन्यांच्या चौदाव्या