Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यार्थिनींना बुरखा बंदी करा

दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी विद्यार्थिनींना बुरखा बंदी करा

मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची शिक्षण मंत्र्यांकडे मागणी

मुंबई : दहावी- बारावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात कॉपी होत असते. या परीक्षा कॉपी मुक्त होण्यासाठी परीक्षा केंद्रात जाताना विद्यार्थिनींना बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशी मागणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट घेऊन केली आहे.

याबाबत मंत्री नितीश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. इयत्ता १० व १२ वी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या परीक्षा आहे. यावर विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरीता शासनस्तरावरुन वेळोवेळी सुचना दिल्या जातात.

मराठा आरक्षणाची नव्यानं पुन्हा सुनावणी

याप्रकरणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणे यांनी राज्य शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होणे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये मुस्लिम विद्यार्थिनी या चेहऱ्यावर बुरखा घालून दहावी बारावीच्या परीक्षा देत असतात. परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनिक उपकराणाचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. बुरख्याच्या आड इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून सहज कॉपी करू शकता आणि त्याचा परिणाम परीक्षेला बसलेल्या अन्य सर्व विद्यार्थ्यांना भोगावे लागू शकतो, अशी भीती मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्र्यांकडे यावेळी बोलताना व्यक्त केली.

त्यामुळे जर, परीक्षार्थीना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून ईलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करुन परीक्षा देत आहे किंवा नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल, असं नितेश राणे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -