Budget 2025 : निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा मांडणार अर्थसंकल्प!

'या' लिंकवर पाहता येणार


नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ मध्ये अर्थसंकल्प तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) येत्या १ फेब्रुवारी रोजी लोकसभेत सकाळी ११ वाजता आठवा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये नव्या आर्थिक वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च) केंद्र सरकारचा प्रस्तावित खर्च आणि महसुली उत्पन्नाचा लेखाजोखा मांडण्यात येणार आहे. मागील चार केंद्रीय अर्थसंकल्प आणि एका अंतरिम अर्थसंकल्पाप्रमाणेच यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्पही पेपरलेस स्वरूपात सादर करण्यात येणार आहे.



कुठे थेट पाहता येईल अर्थसंकल्प?



  • केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत, दूरदर्शन आणि संसद टीव्हीच्या अधिकृत वाहिन्यांवर प्रसारित केला जाईल.

  • सरकारच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरही अर्थसंकल्प प्रसारित केला जाईल.

  • सीतारामन यांचं केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ चं भाषण Prahaar.in वरही पाहता येणार आहे.

  • अर्थसंकल्प www.youtube.com/@PrahaarNewsline या यू ट्युब चॅलवरही बघता येईल.


बजेट २०२५ च्या लाइव्ह अपडेट्स आणखी कुठे मिळतील?



  • अर्थसंकल्पाची कागदी प्रत डिजिटल स्वरूपात केंद्र सरकारच्या www.indiabudget.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर उपलब्ध असेल.

  • राज्यघटनेनं विहित केल्याप्रमाणे वार्षिक वित्तीय विवरण (सामान्यतः अर्थसंकल्प म्हणून ओळखले जाते), अनुदानाची मागणी (डीजी), वित्त विधेयक इत्यादींसह सर्व केंद्रीय अर्थसंकल्पीय दस्तऐवज 'केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅप'वर उपलब्ध असतील.

  • अर्थसंकल्पाची कागदपत्रं हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन