Saturday, May 10, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

बचत गटाच्या महिलांना देणार आता सायबर सुरक्षेचे धडे

बचत गटाच्या महिलांना देणार आता सायबर सुरक्षेचे धडे

मुंबई: मागील काही दिवसांत सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारासाठी ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद आणि एमकेसीएलच्या वतीने महिला सायबर साक्षर अभियान संयुक्तपणे राबविण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार १०० दिवस कृती कार्यक्रम अंमलबजावणी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातूनच महिलांसाठी सायबर साक्षर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उमेद अभियानांतर्गत ६८ महिला प्रभाग संघाशी जोडलेल्या २६ हजार बचत गटात सहभागी असणार्‍या अडीच लाख महिलांना एमकेसीएलच्या अधिकृत अध्ययन केंद्रांमध्ये (एएलसीएस) जाऊन सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे.



महिला दिनापर्यंत यातील किमान १ लाख महिलांना सायबर साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १ फेब्रुवारी ते ८ मार्चदरम्यान सायबर सुरक्षा जागरूकता अभियान राबविण्यात येणार असून, त्यांची नोंदणी २६ ते ३१ जानेवारीदरम्यान tinyurl. com/ ssadrdapune या लिंक करावी लागणार आहे.

Comments
Add Comment