डंपर-ट्रॅक्टरचा भीषण अपघात, तरुणाचा मृत्यू तर तीनजण जखमी

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. अंकुश आत्माराम भिल (वय २७, रा. डिकसाई, जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.


जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणाऱ्या डंपर हा ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला कट मारला तेवढ्यात ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल (वय २२), गणेश भगीरथ भिल (वय १८) आणि शुभम सुखा भिल (वय २०) तिघे राहणार इदगाव ता. जळगाव हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.

Comments
Add Comment

समृद्धी महामार्गावरील स्वच्छतागृहांची दुरवस्था दूर करून ‘गूगल लोकेशन’ एका महिन्यात उपलब्ध करा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे शासनाला निर्देश

नागपूर : विधान परिषदेत आ.मिलिंद नार्वेकर यांनी समृद्धी महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातात नागरिकांच्या

शेत रस्त्याच्या वादात मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण

उपविभागीय अधिकाऱ्यांनाही अधिकार सोपविण्याची तरतूद विलंब टाळण्यासाठी इमेल द्वारे पाठविण्यात येणार नोटीस •

मुद्रांक शुल्क वादाबाबत उच्च न्यायालयाऐवजी थेट राज्य शासनाकडे अपील

विधानसभेत सुधारणा विधेयक एकमताने मंजूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले

 भोगवटादार वर्ग-२ जमिनींवरील 'गहाण शुल्क' वसुलीला कायदेशीर संरक्षण २००९ पासूनची आकारणी वैध ठरणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडलेले विधेयक संमत 'महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी

"उद्धव ठाकरे अधिवेशनासाठी नाही, तर सहलीला आलेत"; परिणय फुकेंचा घणाघात

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपुरात राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातून गावांच्या समृद्धीची दिशा मिळेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान शीर्षक गीत लोकार्पण कार्यक्रम नागपूर : राज्यात मागील काही दिवसात झालेल्या