मुंबई : टोरेस कंपनीच्या एक हजार कोटींपेक्षा जास्त मोठ्या रकमेच्या आर्थिक अफरातफरी प्रकरणी टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी असलेल्या प्लॅटिनम हर्नचा मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ तौसीफ रियाझला अटक करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांनी तौसीफ रियाझला ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा टोरेस घोटाळ्यात तौसीफ रियाझची कसून चौकशी करत आहेत.
Torres : टोरेस घोटाळा प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी!
तौसीफ रियाझ लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याचा ठावठिकाणा समजताच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने धाड टाकली आणि तौसीफ रियाझला अटक केली.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने टोरेस घोटाळ्यात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. एक भारतीय आणि सात युक्रेनचे नागरिक असे आठ आरोपी अद्याप फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.