मुंबई : टोरेस घोटाळा (Torres Scam) प्रकरणातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. व्हैलेन्टीना कुमार, तानिया आणि सर्वेश सुर्वे या तिघांना मुंबई सत्र न्यायालयात रिमांडसाठी शनिवारी हजर करण्यात आले होते. या सुनावणी दरम्यान कोर्टाने निरिक्षण नोंदवत चौकशी पूर्ण झाल्याने अधिक रिमांडची गरज नसल्याचे म्हटले आहे. तर आरोपी व्हॅलेंटिना कुमार आणि सर्वेश सर्वे आता जामिनासाठी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे.
Chandrashekhar Bawankule : पालकमंत्री पदी नियुक्ती होताच चंद्रशेखर बावनकुळे करणार अमरावती दौरा!
सन्माननीय विशेष न्यायालय मुंबईच्या सत्र न्यायालयाने टोरेस गैरव्यवहार प्रकरणातील सर्व संशयित आरोपींना ३० तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या खटल्यातील व्हैलेन्टीना कुमार आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी मी एड. रवी जाधव, राजेश टेके आणि इतर सहकारी त्यामध्ये पात्र झालो असून आगामी काळात आम्ही या संदर्भात बेल अर्ज दाखल करू अशी माहिती अॅड. रवी जाधव यांनी दिली आहे. टोरेस गैरव्यवहार प्रकरणची व्याप्ती लक्षात घेऊन ईडीने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केला होता. या गैरव्यवहार प्रकरणात फसवणूक झालेल्या २ हजारहून अधिक लोकांनी मुंबई पोलिसांशी संपर्क केला आहे.