Friday, February 7, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमाझी नाटकबाजी...

माझी नाटकबाजी…

हलकं फुलकं – राजश्री वटे

ll श्री ll
प्रिय पप्पा’, ‘प्रिय आईस’…
‘सप्रेम नमस्कार’
मी ‘अनन्या’…
‘आई रिटायर होतेय तू’, मी ‘लग्नाची बेडी’,
‘अजून यौवनात मी’!!
विचार केला ‘प्रेम करू या खुल्लमखुल्ला’! जरा बघू
‘प्रेमात तुझा रंग कसा?’
एक शोधला, ‘मी. नामदेव’
‘वय वर्ष पंचावन्न’! व्यवसाय त्याचा ‘किरवंत’
(अग्नी संस्कार करणारे)
हे ‘मृत्युंजय मंत्र’ सांगणारे,
‘सुतावरून स्वर्ग’ गाठणारे…
‘अमेरिका रिटर्न’ आहेत!

मला म्हणाले,’ हम तो तेरे आशिक है’… मग काय ‘ईशारो ईशारो में’… ‘ब्लाईंड गेम’ म्हणू हवं तर!!
त्यांचं ‘सदा सर्वदा’…
‘डार्लिंग डार्लिंग’… अगं आई ‘प्रेमात
सगळंच माफ’…
मी विचारले, ‘सर, प्रेमाचं काय करायचं?’ म्हणाले, ‘तू म्हणशील तसं’
‘इब्लीस’ आहेत जरा…
‘आमने सामने’ ठरवलं सगळं, आधीच सांगितलं
‘विच्छा माझी पुरी करा’…
आपली ‘दहा बाय दहा’ ची खोली… त्यांचा‘देवबाभळी’च्या मागे मोठा ‘वाडा चिरेबंदी’! तिथे ‘प्लँचेट’ करतात म्हणे… पण माझे ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’… ‘साखर खाल्लेला माणूस’
आहे तो!!
आई, ‘तू फक्त हो म्हण’
तू ‘माझी माय सरसोती’ तुम्ही दोघं माझ्यासाठी
‘हिमालयाची सावली’!!
तुमचीच,
‘ती फुलराणी’
‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’.
‘जमलं बुवा एकदाचं’… ‘लग्न, ‘वऱ्हाड निघालं लंडनला’… ‘शामची मम्मी’… ‘मोरूची मावशी’… ‘काका किशाचा’
‘सविता दामोदर परांजपे’,
‘कुसुम मनोहर लेले’,
‘वासूची सासू’… तिचा नवरा ‘सखाराम बाईंडर’
ह्यांची जोडी म्हणजे ‘श्री तशी सौ’! सर्व
‘नाती गोती’
‘गप्पा गोष्टी’ करत निघाली ‘झुंड’ विमानातून… ‘वाऱ्यावरची वरात’…

‘बॅरिस्टर’, ‘गंगाराम नारायण सुर्वे’, ‘घाशीराम कोतवाल’, रघुपती राघव राजाराम’, हे सर्व ‘मित्र’ सुद्धा होते, ‘गंगुबाई मॅट्रिक’ होतीच अगदी ‘चटक चांदणी’! अरे, तिचा नवरा शोधा, ‘गेला माधव कुणीकडे’?… ‘सगळीकडे बोंबाबोंब’… ‘ह्याच काय करायचं’?… ‘शांतेचं कार्ट चालू आहे’… त्याची ‘बायको असून शेजारी’… लक्ष ‘चारचाैघी’ कडे… ‘चावट कुठले’!!!
‘भयंकर आनंदाचा दिवस’ आला… ‘ऐश्वर्या ब्युटी पार्लर’ मध्ये नवरी नटली. ‘कुर्यात सदा मंगलम’ झालं… ‘आसू आणि हसू’ म्हणजे ‘तुमचं आमचं नाटक’ असतं…
‘सुन आली घरा’… ‘जाऊबाई जोरात’ म्हणाली, ‘आली आली हो सुनबाई’…
‘हास्यकल्लोळ’ झाला…
पूजा मांडली… ‘ज्याचा त्याचा विठोबा’… ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ आणि ‘जास्वदी’…
‘सोहळा’ आटोपला… ‘सेलिब्रेशन’
संपलं ! आता दोघे ‘राजाराणी’!…
मोठा ‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ होता तो,
‘वरचा मजला रिकामा’ होता…
‘रात्रआरंभ’ झाली,
‘भिंतीलाही कान असतात’

मनात माझ्या ‘संशयकल्लोळ’ … ‘यदा कदाचित’… ‘कुणीतरी आहे तिथं’… आवाज आला… ‘आलो रे आलो’
‘तेरी भी चूप’… ‘तो घाबरलेला’…
‘झोपी गेलेला जागा झाला’… एक
‘खेळी’ होती ती… ‘कोडमंत्र’ म्हणे! जाऊ दे
‘तरुण आहे रात्र अजुनी’…
‘केंव्हा तरी पहाटे’…
‘नकळत सारे घडले’…
‘तुझ्यात माझ्यात’…
‘ह्याला क्षण एक पुरे’…
‘थोडं तुझं थोडं माझं’…
‘अगं बाई, अरेच्चा’!…
‘मनात माझ्या’ आलंच…
‘दादा, एक गुड न्यूज आहे’ ‘कळा ज्या
लागल्या जीवा’
‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ म्हणाले…
‘ऑल द बेस्ट’…
‘अश्रुंची झाली फुले’…
‘लेकुरे उदंड जाहली’…
नावे ठेवली… ‘लाली लीला’…
ही झाली ‘एका लग्नाची गोष्ट’…
आहे नं… ‘फुल टू धमाल’
नंतर सांगेन…
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’
(एकशे तेरा नाटकांची नावे आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -