नवी दिल्ली: देशात आज ७६वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. संपूर्ण देशभरात याचा उत्साह पाहायला मिळत आहे. कर्तव्यपथावरही जोरदार तयारी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नवी दिल्लीतील कर्तव्यपथावरून देशाचे नेतृत्व करतील.
यंदाचा सोहळा भारताची समृद्ध सांस्कृतिक विविधता, एकता, समानता, विकास आणि लष्करी सामर्थ्याचे एक अनोखे मिश्रण आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे आहेत. सकाळी साडेदहा वाजता या सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तसेच पुढील ९० मिनिटे हा कार्यक्रम सुरू असेल. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण हे फ्लाय पोस्ट असेल. यात भारताच्या हवाई दलाच्या विमानांचे शानदार प्रदर्शन पाहायला मिळेल.
भारताच्या हवाई दलाची ताकद यातून दिसेल. सुमारे 10 हजार विशेष अतिथींना संचलन पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील हे विशेष अतिथी ‘स्वर्णिम भारत’चे शिल्पकार आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या तसेच सरकारच्या योजनांचा उत्तम वापर करणाऱ्यांचा समावेश आहे.
To His Excellency @narendramodi, Her Excellency @rashtrapatibhvn, the Indian Allied Forces, my beloved India, and Indian communities across the world, Happy 76th Republic Day!
Let’s sing together! 🇺🇸🇮🇳 #RepublicDay #India #PMModi @PMOIndia @mygovindia @BJP4India @iccr_hq pic.twitter.com/sVEpoSrrCU
— Mary Millben (@MaryMillben) January 25, 2025
अमेरिकेने भारताला प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या शुभेच्छा
अमेरिकेच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिया यांनी भारताला प्रजासत्ताक दिनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या विधानात म्हटले की अमेरिकेकडून भारताच्या लोकांना त्यांच्या प्रजासत्ताक दिनाबद्दल मी शुभेच्छा देते.